ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

प्रेमाचे भन्नाट किस्से एका 52 वर्षीय शिक्षकाने 20 वर्षीय विद्यार्थिनीशी प्रेमविवाह केला


प्रेमाचे अनेक भन्नाट किस्से हे नेहमीच समोर येत असतात. अशीच एक घटना आता घडली आहे. एका 52 वर्षीय शिक्षकाने 20 वर्षीय विद्यार्थिनीशी प्रेमविवाह केला आहे.ताज्या बातम्या वाचा व जगाशी रहा कनेक्टेड त्यासाठी NEWS वर टच करून व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा.

दोघांच्या वयात मोठा फरक असल्याने सोशल मीडियावर या दोघांची जोरदार चर्चा रंगली आहे. मला शिक्षकाचा लूक आणि पर्सनासिटी खूप आवडली होती असे मुलीने सांगितले. दोघांच्या वयात 32 वर्षांचा फरक आहे. या कारणामुळे नातेवाईकांनीही या लग्नाबाबत नाराजी व्यक्त केली होती. पण तरीही दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचं ठरवलं.

पाकिस्तानमध्ये ही अजब घटना घडली आहे. झोया नूर असं या 20 वर्षीय तरुणीचे नाव आहे. ही झोया 52 वर्षीय साजिद अलीच्या प्रेमात पडली. झोया कॉलेजमधून बीकॉम करत होती. साजिद हे त्याच कॉलेजमध्ये शिक्षक आहेत. झोयाला साजिद यांचा लूक आणि पर्सनालिटी इतके प्रभावी वाटले की ती साजिद यांच्या प्रेमातच पडली. एका मुलाखतीत झोयाने आपली लव्हस्टोरी सांगितली आहे. झोया म्हणाली “सुरुवातीला साजिदने माझ्याकडे खूप दुर्लक्ष केले. पण एके दिवशी मी साजिदकडे प्रेम व्यक्त केले. मी त्याला सांगितले की तुम्ही मला खूप आवडता आणि मला तुमच्याशी लग्न करायचे आहे.”
झोया आणि आपल्या वयात मोठा फरक आहे याबाबत साजिद विचार करू लागले. झोयाच्या प्रपोजलवर साजिद यांनी वयातील मोठ्या फरकावर विचार करण्यासाठी एका आठवड्याचा वेळ मागितला. या एका आठवड्यात साजिदही झोयाच्या प्रेमात पडू लागले. त्यानंतर दोघांनी लग्न केले. या लग्नाबाबत साजिद यांचे नातेवाईकही नाराज होते. याबाबत माहिती देताना साजिद म्हणाले की, “या निर्णयामुळे माझे अनेक नातेवाईक माझ्यावर संतापले. ते म्हणायचे की तू खूप देखणा आहेस, ही मुलगी तुला साजेशी नाही. झोया हिला देखील तिच्या नातेवाईकांचा विरोध होता. मात्र पण जर तुम्ही प्रेम केले असेल तर लग्न करावेच लागेल, अशी भूमिका झोयाने घेतली.”

साजिदच्या कौतुक करताना झोया म्हणाली, ‘ते या परिसरातील सर्वोत्कृष्ट शिक्षक आहेत, मला हाच त्यांचा गुण जास्त आवडला. त्यांची समजावण्याची पद्धत खूपच छान आहे. मी त्यांची चाहती आहे. तर दुसरीकडे, साजिदने झोयाच्या या चांगल्या सवयींबाबतही सांगितले. ती घरून उत्तम आणि चविष्ट जेवण आणते. तसेच ती ऑफिसमध्ये चहा खूप छान बनवते, असे साजिद यांनी सांगितले. लोकांनी दोघांना त्यांच्या लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button