गर्लफ्रेंडने तिच्याच प्रियकराला विष पाजून मारले

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


केरळच्या तिरुअनंतपूरमध्ये एका गर्लफ्रेंडने तिच्याच प्रियकराला विष पाजून मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत तरूणाचं नाव शेरॉन राज असं असून त्याचा 25 ऑक्टोंबरला मृत्यू झाला होता.
पोलिसांच्या तपासामध्ये उघड झालं आहे की शेरॉन राजला त्याच्याच गर्लफ्रेंडने मारलं आहे. मात्र शेरॉन राजला का मारलं यामागचं कारण अद्याप समोर आलं नाही.

ताज्या बातम्या वाचा व जगाशी रहा कनेक्टेड त्यासाठी आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा. https://chat.whatsapp.com/K8XH9v1Lzc68sEVQxNANnp

नेमकं काय आहे प्रकरण?
मृत शेरॉन राजची गर्लफ्रेंड शेरॉनला 14 ऑक्टोबरला त्याच्या घरी घेऊन जाते. तिथे त्याला ज्यूसमध्ये कीटकनाशक देते. त्यानंतर त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याचे शरीरातील अवयव निकामी झाल्याने मृत्यू झाला. मात्र शेरॉनच्या घरच्यांनी हा पूर्वनियोजित खून असल्याचा आरोप केला.

शेरॉनच्या पोस्टमॉर्टमनंतर डॉक्टरांनी सांगितलं की, शेरॉनचा मृत्यू एकाधिक अवयव निकामी झाल्यामुळे झाला. काही ऍसिडिक पदार्थाने त्याच्या अंतर्गत अवयवांना इजा झाली आहे. पोलिसांनी आरोपी गर्लफ्रेंडची कसून चौकशी केल्यावर तिने गुन्हा कबुल केला आहे. मात्र तिने हे पाऊल का उचललं याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.