बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या वादावर समोपचाराने तोडगा काढत पूर्णविराम ?

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


चर्चेनंतर बच्चू कडू आणि रवी राणा यांनीही थोडक्यात प्रतिक्रिया दिली आहे. समोरासमोर चर्चा झाली नसल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे. तर, या बैठकीत चर्चा सकारात्मक झाली असून ‘हम साथ साथ है, हम दोस्त है’ अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दूरध्वनीवरून दिली आहे. मात्र माध्यमांसमोर बोलण्यास उपमुख्यमंत्री फडणवीस आणि आमदार रवी राणा यांनी टाळलं आहे.

मुंबई : बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद शिगेला पोहोचलेला आहे. अशात हा वाद मिटवण्यासाठी रविवारी दोघांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मध्यरात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत कडू आणि राणा वादावर दोन तास चर्चा करण्यात आली.
चर्चेत वादाला पूर्णविराम देण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या वादावर समोपचाराने तोडगा काढत पूर्णविराम देण्यात आला असल्याची माहीती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या जाहीर आरोप प्रत्यारोपांमुळे युतीचं वातावरण दुषित होत आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील दोन्ही नेत्यांना योग्य समज देऊन युती धर्माचं पालन करण्यास सांगण्यात आलं असल्याचं समोर येत आहे.
एकमेकांविरुद्ध जाहीर वाच्यता न करता शिंदे आणि फडणवीस यांच्याशी चर्चा करून मार्ग काढावा, असं या चर्चेत ठरलं आहे. वर्षा बंगल्यावर तब्बल अडीच तास झालेल्या या मॅरेथॉन चर्चेत तोडगा निघाल्याची शक्यता आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री, आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने कडू राणा वाद शमणार