क्राईमताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रमुंबई

आईनेच दोन मुलांची हत्या केल्याची खळबळजनक घटना


मुंबई : आईनेच दोन मुलांची हत्या केल्याची खळबळजनक घटना नवी मुंबईच्या घणसोलीमध्ये घडली आहे. अघोरी कृत्यातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.
नवरा-बायकोच्या भांडणातून आईने मुलांची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. नवी मुंबईतील घणसोली येथे आईने आपल्या दोन मुलांची चाकूने हत्या केली, यानंतर तिने स्वत:ही पंख्याला गळफास लावून घेतला, पण पंखा तुटल्याने तिचा जीव वाचला. पंखा तुटल्याचा आवाज ऐकून इमारतीतील बाकीचे लोक त्यांच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर त्यांना 4 वर्षांची मुलगी आणि 1 वर्षाचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी तिघांना रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी मुलांना मृत घोषित केलं, तर आईला उपचारासाठी वाशीमधल्या महानगरपालिका रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. मृत्यू झालेल्या एक वर्षाच्या मुलाचा पहिला वाढदिवस 28 ऑक्टोबरलाच साजरा करण्यात आला होता. वडिलांचा स्वत:चा व्यवसाय असल्यामुळे घटनेच्या वेळी ते घरात नव्हते. याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button