बीड जलजीवन मिशन योजनेंतर्गत गैरव्यवहार,जीवघेणा हल्ला

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


जलजीवन मिशन योजनेंतर्गत गैरव्यवहार प्रकरणातील तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध,सुत्रधारांसह हल्लेखोरांना तात्त्काळ अटक करा;गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
___
बीड जिल्ह्य़ातील जिल्हापरिषद जलजीवन मिशन योजनेंतर्गत गैरव्यवहार प्रकरणातील तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते संभाजी बाबुराव सुर्वे यांच्यावर आज दिनांक.२८ ऑक्टोबर २०२२ वार शुक्रवार रोजी दुपारी जीवघेणा हल्ला झाला असुन सदरील हल्ला जलजीवन मिशन योजनेंतर्गत गैरव्यवहार प्रकरणातील लाभार्थी ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हापरिषद बीड विभागातील आधिकारी यांनी कंत्राटदार ठेकेदार यांच्याशी संगनमतानेच जलजीवन मिशन योजनेंतर्गत गैरव्यवहार प्रकरणातील तक्रारदारांवर दबाव आणण्यासाठी हल्ला केला असून सदरील प्रकरणातील हल्लेखोर तसेच त्यामागील सुत्रधार यांना तातत्काळ अटक करण्यात यावी तसेच हल्लेखोर यांचे फोनची सीडीआर तपासणी करून कोणाकोणाशी हल्लेखोर संपर्कात होते याची उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंढे यांने ईमेल द्वारे तक्रार केली असून संबधित प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

ग्रामिण पाणीपुरवठा विभागातील आधिकारी आणि कंत्राटदार यांच्या संगनमतानेच हल्ल्याचा संशय
___
उपआयुक्त यांच्या फोनवरून संभाजी सुर्वे ज्युनियर इंजिनिअर ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हापरिषद बीड यांच्या गाडीत बसून पांगरी गावात जातात आणि त्यांच्या समोर निखिल चव्हाण यांच्यासह ५-६ हल्लेखोर जीवघेणा हल्ला करतात. पोलीस संरक्षण सोबत का नव्हते तसेच सरकारी कामात अडथळा म्हणून तक्रार न करणे आदि गोष्टी संशयास्पद असुन संबधित प्रकरणात ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हापरिषद बीड विभागातील आधिकारी आणि कंत्राटदार यांनी संगनमतानेच हल्ला करून दबाव आणण्याचा प्रयत्न असुन संबधित प्रकरणात सखोल चौकशी करण्याची गरज आहे.

सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
___
जलजीवन मिशन योजनेंतर्गत गैरव्यवहार प्रकरणातील तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते संभाजी सुर्वे यांच्यावरील हल्लेखोर तसेच सूत्रधारांना तात्काळ अटक न केल्यास दि.३१ ऑक्टोबर सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा ईशारा दिला आहे.

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२

यांच्या नेतृत्वाखाली दि.३१ ऑक्टोबर २०२२ सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येणार आहे याची गंभीर नोंद घ्यावी.