पतीने पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं..

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


33 वर्षीय श्वेताचे 25 वर्षीय सुरेशसोबत अनैतिक संबध होते. पती चंद्रशेखर कामावर गेल्यानंतर श्वेता सुरेशला घरी बोलावून नको ते कृत्य करत होती. श्वेताचे वागणे, बोलणे बदलल्याने पती चंद्रशेखरला तिच्यावर संशय आला. एकेदिवशी चंद्रशेखर हा कामावरून लवकर घरी परतला. तेव्हा त्याने श्वेताला प्रियकर सुरेशसोबत नको त्या अवस्थेत बघितलं.

बेंगळुरू : कर्नाटकातील बंगळुरू शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. पतीने पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं. त्यानंतर झालेल्या वादातून पत्नी आणि तिच्या प्रियकराने पतीची निर्घृणपणे हत्या केली.
इतकंच नाही, तर पत्नीने पतीचा प्रायव्हेट पार्टही कापला. त्यानंतर मृतदेह (Crime News) एका इमारतीच्या छतावर फेकून दिला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीसह तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.
चंद्रशेखर (वय 39) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. श्वेता (वय 33) आणि तिचा प्रियकर सुरेश (वय 25) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, मृत चंद्रशेखर हा व्यवसायाने विणकर असून 21 ऑक्टोबर रोजी त्याचा मृतदेह येलहंका येथील कोंडाप्पा ले-आऊटमधील इमारतीच्या छतावर आढळून आला होता.
चंद्रशेखर याचा प्रायव्हेट पार्ट गायब असल्याने ही हत्या असावी, असा संशय पोलिसांना होता. याप्रकरणात पोलिसांनी चंद्रशेखरची पत्नी श्वेता हिची चौकशी केली. आपल्यापाठीमागे लागलेल्या एका व्यक्तीनेच चंद्रशेखर यांची हत्या केली, असा बनाव श्वेताने पोलिसांसमोर रचला. मात्र, पोलिसांना वेगळाच संशय होता.

संशयावरून पोलिसांनी श्वेताचा मोबाईल तपासला असता पतीच्या हत्येत तिचाच सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी श्वेताची कसून चौकशी केली असता, आपणच प्रियकरासोबत पती चंद्रशेखरची हत्या केली असल्याची कबूली तिने दिली. याप्रकरणी पोलिसांनी श्वेतासह तिचा प्रियकर सुरेशला ताब्यात घेतलं आहे.