क्राईमताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

प्रेयसीनं फोन करून युवकाला घरी बोलावलं दोघांना रंगेहाथ एकत्र पकडलं..


पीलीभीत : पूरनपूर इथं प्रेयसी घरात एकटी असताना घरी जाणं बॉयफ्रेंडला चांगलेच महागात पडलं आहे. या घटनेनं गावात खळबळ उडाली. प्रेयसीच्या घरच्यांनी बॉयफ्रेंडला बंद खोलीत बेदम बदडलं.घडलेल्या प्रकारानंतर युवकाच्या घरचेही प्रेयसीच्या घरी पोहचले तिथे दोन्ही कुटुंबामध्ये हाणामारी झाली. स्थानिकांनी याबाबत पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यानंतर प्रियकर-प्रेयसीसह ५ जणांना ताब्यात घेण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, एकाच गावात राहणाऱ्या युवती आणि युवकामध्ये प्रेमसंबंध सुरू होते. हे दोघंही एकमेकांचे नातेवाईक आहेत. ३ वर्षापासून दोघांमध्ये प्रेमाचं नातं आहे. परंतु लग्नासाठी दोन्ही कुटुंबाचा नकार आहे. या दोघांना भेटण्यास घरच्यांनी विरोध केला परंतु संधी मिळताच दोघं एकमेकांना लपून भेटत असतात. बुधवारी प्रेयसीच्या घरी कुणीच नव्हते. घरातील सगळे शेतावर गेले होते.
त्यावेळी प्रेयसीनं फोन करून युवकाला घरी बोलावलं. तेव्हा अचानक प्रेयसीचा काका घरी पोहचला आणि त्यानं रंगेहाथ दोघांना एकत्र पकडलं. यावेळी संतापलेल्या काकाने इतरांना बोलावून प्रियकराला बंद खोलीत बेदम मारहाण केली. युवकानेही फोन करून त्याच्या घरच्यांना याची माहिती दिली. तेव्हा प्रेयसीच्या घरी युवकाचे कुटुंबही जमले तिथे दोन्ही कुटुंबात वाद झाला. या वादाचं रुपांतर हाणामारीत झाले.

युवकाच्या वडिलांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. प्रेयसीने युवकासोबतच लग्न करणार असा हट्ट धरला. वादानंतर पोलिसांनी युवक, युवती आणि त्यांच्या कुटुंबाला कोतवालीला नेले. दोन्ही कुटुंबाने एकमेकांविरोधात मारहाण करून जखमी केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले आहे. तक्रार मिळाल्यानंतर दोषींवर योग्य कारवाई केली जाईल असं वरिष्ठ अधिकारी अशोक पाल यांनी सांगीतल .


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button