ताज्या बातम्यामहाराष्ट्र

दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांना अटक


नाशिक:अंबड औद्योगिक वसाहतीत दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या सहा संशयितांना अंबड पोलिसांनी शिताफीने अटक केली. त्यांची चौकशी केली असता ते दरोडा टाकण्याच्या तयारीत होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बिजली, पोलिस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, पोलिस निरीक्षक राजू पाचोरकर, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक वसंत खतेले यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड औद्योगिक वसाहतीत पथकाची गस्त सुरू होती. त्यावेळी सायको क्रेन कंपनीसमोरील रस्त्यावर मध्यरात्री 2.15 च्या सुमारास संशयित करण कडूसकर (22, अंबड), शुभम साहेबराव अरगडे (२२, रा. कोपरगाव), सतीश बबन माने (२४, रा. दत्तनगर, चुंचाळे), विठ्ठल सुदाम गवारे (३०, रा. घरकुल, अंबड), चंद्रशेखर शंकर विश्वकर्मा, वैभव रणजित लोखंडे हे संशयास्पदरीत्या आढळले. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.



त्यांची चौकशी केली असता ते दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे समजले. पोलिसांनी सहाही संशयितांवर गुन्हा दाखल करून अटक केली. त्यांच्याकडून दरोड्यासाठी लागणारी हत्यारे जप्त केली. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक गणेश मुगले अधिक तपास करीत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button