ताज्या बातम्यादेश-विदेशबीडमहत्वाचेमहाराष्ट्र

राष्ट्रपती व पंतप्रधानांच्या हस्ते गौरवप्राप्त किरणकुमार गित्ते यांचा परळीत नागरी सत्कार


परळी ही रत्नांची खान, किरण गित्ते परळीची शान – आ.धनंजय मुंडे

परळी चा गौरव व नावलौकिक वाढेल असे कार्य करू – किरणकुमार गित्ते

राष्ट्रपती व पंतप्रधानांच्या हस्ते गौरवप्राप्त किरणकुमार गित्ते यांचा परळीत नागरी सत्कार

परळी वैजनाथ  : परळी ही रत्नांची खान असुन या भागातुन अनेकजण वेगवेगळ्या क्षेत्रात देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कार्याद्वारे चमकत आहेत. त्रिपुरा राज्याचे नगर विकास खात्याचे सचिव किरणकुमार गित्ते हे परळीची शान असुन देशाच्या राष्ट्रपती व पंतप्रधानांच्या हस्ते त्यांचा नुकताच गौरव झाला.गित्ते यांच्या प्रशासकिय सेवेतील ज्ञानातुन महाराष्ट्राला लाभ व्हावा यासाठी मी त्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांनी सांगितले.राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरव प्राप्त केलेले परळीचे भुमिपुत्र त्रिपुरा राज्याचे नगर विकास खात्याचे सचिव किरणकुमार गित्ते यांचा रविवारी परळीत नागरी सत्कार करण्यात आला.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे रविवार दि.23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजत पार पडलेल्या या नागरी सत्कार सोहळ्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त रघुनाथ खेत्रे हे होते तर जेष्ठ नेते प्रा.टि.पी.मुंडे,माजी आ.संजय दौंड, विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा उषा किरण गित्ते, दिनकर मुंडे गूरूजी, बेलंबा गावच्या सरपंच इंदूमती दिनकरराव गित्ते, वर्गमित्र लक्ष्मीकांत दगडगुंडे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, डॉ.राजाराम मुंडे, हभप प्रभाकर झोलकर महाराज, आदींची उपस्थिती होती.

यावेळी माजी मंत्री आ.धनंजय मुंडे आपल्या भाषणात अनेक राजकीय गुपीतांचेही संकेत देत सध्या असलेली राजकीय गडूळ पाणी थोड्या दिवसातच स्वच्छ होईल असे संकेतही असे सांगत शुन्यातुन विश्व निर्माण करण्याचे उदाहरण म्हणजे त्रिपुरा राज्याचे नगर विकास खात्याचे सचिव परळीचे भुमिपुत्र किरण गित्ते हे आहेत,एका वर्षात महामहिम राष्ट्रपती व प्रधानमंत्र्याच्या हस्ते गौरव होणे ही परळीसाठी अभिमानाची बाब आहे.

नागरी सत्कार सोहळ्यास उत्तर देताना किरणकुमार गित्ते हे अत्यंत भावुक होवुन मी देशाच्या प्रशासकिय सेवेत जे काही काम करत आहे त्याची प्रेरणा आई- वडील,वर्गमित्र व परळीकरांकडुन मिळाली. प्रशासकीय सेवेत काम करताना लोकहीत व लोककल्याण ला सर्वाधिक महत्व दिल्यानेच यश प्राप्त झाले. येत्या काळात परळीचा गौरव व नावलौकीक वाढेल असे कार्य करू असा विश्वास श्री किरणकुमार गित्ते यांनी व्यक्त केला. परळी या माझ्या गावी होत असलेला हा सन्मान माझ्यासाठी सर्वोच्च असल्याचे सांगितले.

यावेळी जेष्ठ नेते प्रा.टि.पी.मुंडे, प्रा.पवन मुंडे, लक्ष्मीकांत दगडगुंडे यांनी मनोगतातुन शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश मुंडे यांनी केले तर प्रस्ताविक अनंत मुंडे यांनी केले व आभार प्रा.शंकर कापसे यांनी केले.

अवघ्या दोन दिवसात नेत्रदिपक कार्यक्रमाचे नियोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते गौरव प्राप्त केल्यानंतर किरण गित्ते यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे परळी येथे आयोजन केले.नियोजन समितीचे सुरेश (नाना) फड, प्रदिप खाडे, प्रा. पवन मुंडे, प्राचार्य अतुल दुबे, रवी कांदे, अंकुश फड, किशोर गित्ते, भास्कर आंधळे, निळकंठ दराडे, ऍड. प्रकाश मुंडे,हरिष नागरगोजे, लक्ष्मण मुंडे, नामदेव मुंडे सर, मनजीत सुगरे रमाकांत बुरांडे, कोमवार सर, बंडू आघाव आदींनी अवघ्या दोन दिवसात या नागरी सत्कार सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन करुन उच्च दर्जाचा व सर्वसमावेशक कार्यक्रम पार पाडला. या समितीचे अनेकांनी कौतुक केले.

संस्था, संघटनांकडुन सत्कार

आयएएस किरण गित्ते यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात परळी व परिसरातील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.या सत्कार सोहळ्यात किरणकुमार गित्ते यांचा मारवाडी युवा मंच, मेडिकल असोसिएशन, डॉकटर असोसिएशन, वकिल संघ, संस्थाचालक संघटना, मुख्याध्यापक संघटना, विविध व्यापारी संघटना, नाथ शिक्षण संस्था, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद, वकील संघ, ग्रामीण पोलिसांच्या वतीने, पंचायत समितीचे सभापती, पत्रकार संघ, परळी सिसिड्स अँड फर्टीलाइजर्स संघ, आडत व्यापारी संघसह संस्था व संघटनांच्या पदाधिकार्यांनी सत्कार केला.

नाथ शिक्षण संस्थेकडुन सत्कार

परळीच्या शैक्षणीक क्षेत्रात अल्पावधीतच नावलौकिक मिळवलेल्या नाथ शिक्षण संस्थेच्या वतिने अध्यक्ष आ.धनंजय मुंडे, सहसचिव प्रदीप खाडे व सर्व शाळांचे मुख्याध्यापक प्राचार्य सर्व शिक्षक वर्ग यांच्या वतीने या नागरी सत्कार सोहळ्यात सत्कारमुर्ती किरणकुमार गित्ते यांचा सत्कार करण्यात आला.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button