मांजरा-साळ नदीवरील पावसाळ्यात वाहुन गेलेल्या पुलाची आंदोलनापुर्वीच दुरूस्ती-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

मांजरा-साळ नदीवरील पावसाळ्यात वाहुन गेलेल्या पुलाची आंदोलनापुर्वीच दुरूस्ती-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

पाटोदा : शहरातील मांजरा-साळ नदीच्या संगमावरील पुल दरवर्षीच पावसाळ्यात वाहुन जात असल्यामुळे या पुलाच्या मार्गावरील सार्वजनिक स्मशानभुमी,ग्रामिण रूग्णालय,विठ्ठल संस्थान,उप भुमिअभिलेख कार्यालय तसेच भाकरे वस्ती,लऊळ वस्ती,बामदळे वस्ती येथील रहिवाशांना २-३ किलोमीटर अंतर दुरून प्रवास करावा लागत असे. भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या गुरूवार रोजी ठीय्या आंदोलनाचा ईशारा
दरवर्षीच पावसाळ्यात वाहुन जात असल्यामुळे व या भागातील रहिवाशांची अडचण येत असल्यामुळे गेल्या ३ वर्षापासून तक्रारीनंतर दि.२७ ऑक्टोबर गुरूवार रोजी पुलावर ठीय्या आंदोलन करण्याचा ईशारा पाटोदा प्रशासनाला दिला होता. आमदार सुरेश (आण्णा )धस यांच्या आदेशानुसार
आबुशेठ व नगरसेवक रामेश्वर गोरे यांनी दुरूस्ती करून रहिवाशांची अडचण दुर केली
माजी जि.प.अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला यांनी आ.सुरेश आण्णा धस यांच्या मार्गदर्शनात नगरसेवक रामेश्वर गोरे यांनी ताबडतोब स्वखर्चाने दीड लाख रूपये खर्च करून उभे राहून पुलाची दुरूस्ती करून घेतली त्याबद्दल भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार इद्रीस चाऊस यांच्या हस्ते नगरध्यक्षा पुत्र सय्यद आदम ,रामेश्वर गोरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पाटोदा तालुकाध्यक्ष हमीदखान पठाण,शेख जावेद,जाकेर पठाण आदि उपस्थित होते.

दुरूस्ती ऐवजी नविन कमानी पुलाची आवश्यकता,आ.सुरेश धस अणाणाचे पाठपुरावा करण्याचे आश्वासन:-डाॅ.गणेश ढवळे
____
दरवर्षीच पावसाळ्यात वाहुन जाणा-या पुलाची दुरूस्ती करण्याऐवजी नविन कमानी पुलाची गरज असून आ.सुरेश आण्णा धस यांच्याशी संपर्क साधला असता त्याठिकाणी नविन पुलासाठी पाठपुरावा करून पुढच्या पावसाळ्यापुर्वी नविन पुल करण्याचे आश्वासन दिले.