ताज्या बातम्याबीड

बीड येथील साद फाउंडेशन तर्फे गरीब कुटुंबांना दिवाळीचे फराळ वाटप


बीड येथील साद फाउंडेशन तर्फे गरीब कुटुंबांना दिवाळीचे फराळ वाटप
आष्टी / बीड : ( गोरख मोरे ) बीड येथील साद फाउंडेशन तर्फे बीड येथील अनेक भागातील गोरगरीब कुटुंब शोधून दिवाळीचे फराळ वाटप करून या कुटुंबांची दिवाळी गोड करण्याचे काम साद फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले . हा उपक्रम बीड मधील अनेक भागात राबवण्यात आला असून ग्रामीण भागात गोरगरीब कुटुंबांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून साद फाउंडेशनचे अध्यक्ष मेहर शेख , उपाध्यक्ष नारायण औटे, यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला असून यात सर्व सहभागी मित्र परिवारांचे आभार मानले .
याप्रसंगी बाळू तावरे , दशरथ बहिर , अमोल झोजे, कल्याण गावडे , सुनील टुले, शेख शौकत , प्रदीप आगाम , मकरंद आगाम , रवी शेंदाडे , असलम आदी मित्रपरिवार याप्रसंगी उपस्थित असून सर्वांच्या सहकार्यातून साद फाउंडेशनचा बीडमधील गोरगरीब कुटुंबांना दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आले .


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button