ताज्या बातम्यामहत्वाचे

आ सुरेश धस यांच्या हस्ते तेजवार्ता दिपोत्सव चे प्रकाशन संपन्न


आ सुरेश धस यांच्या हस्ते तेजवार्ता दिपोत्सव चे प्रकाशन संपन्नआष्टी : बीड व अहमदनगर जिल्ह्याच्या सिमेवरून प्रसिद्ध होत असलेल्या तेजवार्ता च्या १९ व्या दिवाळी अंकाचे प्रकाशन माजी मंत्री तथा बीड उस्मानाबाद लातुर विधान परिषदेचे आमदार सुरेश आण्णा धस यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा कामधेनू उद्दोग समुहाचे संचालक कांतीलालजी चानोदिया , युवा नेते सागर आप्पा धस , माजी सभापती अंकुश चव्हाण , माजी सरपंच राजाभाऊ शेळके , शेख अहेमदभाई , आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम तसेच संपादक सय्यद बबलूभाई , उपसंपादक संदीप जाधव , महादेव वामन , कॅमेरामन शेख हमजान , अनिल मोरे , शेख समिर आदी मान्यवर उपस्थित होते . ग्रामिण भागातुन प्रसिद्ध होत असणारा तेजवार्ता दिपोत्सव पूर्ण महाराष्ट्रात सुपरिचीत झालेला लोकप्रिय अंक ठरला असुन तेजवार्ता न्युज नेटवर्क ने राज्यभरात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे . याबाबत आ . सुरेश धस यांनी तेजवार्ता च्या सर्व टिम चे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या . राज्यभरातुन विवीध भागातील नामवंत साहित्यीकांच्या वाचनिय साहित्याचा बहारदार नजराना घेऊन हा दिपोत्सव अंक प्रेक्षकांच्या भेटीला आला असुन वाचकांच्या पसंतीस नक्कीच पात्र ठरेल अशी अपेक्षा तेजवार्ता टिम ने व्यक्त केली आहे . प्रत्येक ठिकाणी तेजवार्ता अंकाचे उत्साहात स्वागत होत असुन वाचकांचा व जाहिरातदारांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे . त्याबद्दल तेजवार्ता टिम कडून सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले . काळानुरूप आवश्यक बदल लक्षात घेता तेजवार्ताने सुरु केलेल्या ऑनलाईन वेब चॅनल ला राज्यभरातुन चांगला प्रतिसाद मिळत आहे . सर्वात वेगवान वृत्त प्रसिद्ध करण्याचा तेजवार्ता नेहमीच प्रयत्न करत असतो . सामाजिक बांधीलकी जपत वृत्तांकन करण्यात तेजवार्ता टिम नेहमीच अग्रेसर असते . तसेच तेजवार्ता फिल्म प्रॉडक्शन च्या माध्यमातुन सामाजिक संदेश देणारे अनेक लघूपटही तेजवार्ता च्या माध्यमातुन प्रेक्षकांनी पाहिले आहेत व त्यांनाही पसंती दर्शविली आहे . तेजवार्ता दिपोत्सवाचे सर्व स्तरातुन जोरदार स्वागत होत आहे .


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button