महिलेला अमानुष मारहाण केली, तर आता गप्प का? – शालिनी ठाकरे

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


दिवाळी सणाच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्र आल्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत युती होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
परंतु महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी रायगडमधील एका गंभीर घटनेचा संदर्भ देत राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे.

शालिनी ठाकरे यांनी एक ट्वीट करत एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये रायगडमध्ये झालेल्या घटनेचं वृत्त दाखवण्यात आलं आहे. रायगडच्या तळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा आणि त्यांच्या पतीने एका निवृत्त महिला ग्रंथपालाला शिल्लक राहिलेला पगार मागितल्याच्या कारणावरून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
मनसेच्या पदाधिकाऱ्याने महिलेला मारहाण केली तर महिला आयोग स्वत:हून पुढाकार घेत पोलीस अहवाल मागवते. मग आज त्याच आयोगाच्या अध्यक्षा असलेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याने महिलेला अमानुष मारहाण केली, तर आता गप्प का?, असा सवाल शालिनी ठाकरे यांनी रुपाली चाकणकर यांच्यासमोर उपस्थित करत खोचक टीका केली आहे.