अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्या निवासस्थानी दिवाळी यावेळी कमला हॅरिसही फटाके फोडताना

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


भारतासह जगभरात दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचला असून, अनेक लहानमुलं फटाके फोडण्याचा आनंद घेताना दिसत आहे. मात्र, सध्या एक व्हिडिओ समोर आला असून, यामध्ये बलाढ्य देश अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिसही फटाके फोडताना दिसून येत आहेत.
यावेळी हॅरिस म्हणाल्या की, दिवाळी हा संस्कृतींमधील सलोखा मांडणारा सण आहे.
अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी त्यांच्या निवासस्थानी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी उपस्थितांसोबत फुलबाजी उडवतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. उपराष्ट्राध्यक्ष हॅरिस यांच्या निवास्थानी यावेळी रंगीबेरंगी दिव्यांनी उजळून निघाले होते. याशिवाय सेलिब्रेशन करण्यासाठी बोलवण्यात आलेल्या पाहुण्यांसाठी खास भारतीय जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये पाणीपुरीपासून पारंपारिक मिठाईपर्यंत भारतीय पदार्थ ठेवण्यात आले होते. या विशेष पार्टीसाठी हॅरिस यांनी सुमारे 900 लोकांना आमंत्रित केले होते.
हॅरिस यांनी चेन्नईतील आजी-आजोबांसोबत साजरा केलेल्या दिवाळी उत्सावाच्या आठवणींना उजाळा दिला. हॅरिस यांच्या पार्टीत सर्जन जनरल डॉ. विवेक मूर्ती, राष्ट्राध्यक्षांचे विशेष सल्लागार नीरा टंडन, विनय रेड्डी, आदींसह अनेकजण सहभागी झाले होते. भारतातील अमेरिकेचे राजदूत रिच वर्मा यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली होती.