ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

मासे पकडण्यासाठी नदीवर गेला त्याने अजगराला आपल्या हातात धरलं आणि पुढे काय?


मासे पकडताना एखादा दुसरा प्राणी किंवा काही ना काही हाताला विचित्र लागल्याची प्रकरण तुम्हाला माहिती असतील. पण माशांऐवजी हा दुसरा प्राणी अजगर असेल तर..
असंच घडलं ते एका व्यक्तीसोबत. मासे पकडायला गेलेल्या या व्यक्तीच्या गळाला मासा लागला की नाही माहिती नाही पण त्याच्या गळ्यात मात्र भलामोठा अजगर मात्र अडकला. झारखंडमधील ही धक्कादायक घटना आहे. ज्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.



झारखंडच्या गढवा जिल्ह्यातील खुर्द गावात राहणारी ही 55 वर्षांची व्यक्ती. बिरजलाल राम भुइया असं या व्यक्तीचं नाव आहे. बिरजलाल मासे पकडण्यासाठी नदीवर गेला. पाण्यात उतरल्यानंतर त्याला भलामोठा अजगर दिसला.

आता आपल्याला साधा छोटा साप दिसला तरी घाम फुटतो मग भलामोठा अजगर समोर आला तर तुम्ही काय कराल? साहजिकच कुणीही घाबरेल आणि अजगरापासून दूर पळून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करेल. पण या व्यक्तीने मात्र त्याच्या उलट केलं आणि तेच त्याला महागात पडलं.
मजेमजेत त्याने अजगराला आपल्या हातात धरलं आणि शरीराभोवती गुंडळालं.

त्याच्यासोबत खेळ केला. आता अजगर तो अजगर… त्यानेही आपलं खतरनाक रूप दाखवलं. व्यक्तीने आपल्या शरीराभोवती गुंडाळल्यानंतर अजगरानेही त्याच्या मानेभोवती आपला विळखा घट्ट केला.

त्यानंतर मात्र अजगरासोबत खेळ करणारी ही व्यक्ती आपला जीव वाचवण्यासाठी धडपडू लागली. मदतीसाठी मोठमोठ्याने ओरडू लागली. त्याचा आवाज ऐकून त्याचा मुलगा धावत आला. त्याने आपल्या काही मित्रांच्या मदतीने आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी धडपड सुरू केली.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता अजगराने कशा पद्धतीने या व्यक्तीला जखडलं आहे आणि मुलं त्याची विळख्यातून सुटका करण्याचा प्रयत्न करत आहेत. बऱ्याच तासांनंतर त्यांनी त्याची अजगराच्या तावडीतून सुटका केली. पण तो गंभीर जखमी झाला.

✍️✍️हे ही वाचा

लोकशाही न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड  वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

नवगण न्युज  वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button