ताज्या बातम्यादेश-विदेशबीडमहत्वाचेमहाराष्ट्र

महसूल प्रशासन म्हणजे आंधळा दळतय अन कुत्र पीठ खातय ! जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण


महसूल प्रशासन म्हणजे आंधळा दळतय अन कुत्र पीठ खातय !धारूर देवस्थान इनामी जमिनी प्रकरणी सय्यद सलीम बापू यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण सुरू

बीड (प्रतिनिधी) :- धारुर तालुक्यातील देवस्थानाच्या इनामी जमीनी विषयी झालेल्या फेरफार,रजिस्ट्री व पी.टी. आर . देणाऱ्या तत्कालीन तहसीलदार,मंडळ अधिकारी,तलाठी , रजिस्ट्री ऑफीस व नगर परिषद यांची चौकशी करुन यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आज सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर लोकतंत्रिक जनता दलचे जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम बापू यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत अमरण उपोषण सुरू आहे,
धारूर धारूर तालुक्यात वक्फ मंडळ कार्यालय अंतर्गत येणाऱ्या देवस्थान दीड हजार च्या जवळपास देवस्थानाची जमीन इनामी जमिनी आहे सदरील देवस्थान जमिनीवर मोठ्या प्रमाणात धारूर तहसील कार्यालय, मंडळ अधिकारी, नगरपरिषद कार्यालय यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात फेरफार व रजिस्टर चे प्रकार झाले आहेत तरी वरील प्रकरणात धारूर तालुक्यातील स.नं .५४८ / १०,५४८ / १ ९ , ५४८/१३ , ५४८/६ , ५४८/७ , ५४८ / ९ , ५५४/१ , ५५४ / २ , ५५४/५ , ५५४/६ , ५५४/७ , २०५ , २०६/१ , ३४३ , ३५ , ३५१ , ३५२ , ३५४ , ३५६ ३५७ , ३६०/२ , ३४ , ३६२ / अ / २ , ३६५ , ३६ ९ , ३७० , ३७२ , ३७६ , ३७८ , ५ , ५५,५५३ , ५६०/१ , ६२२ , ६२४ अ , ६२४ आ , ५ ९ १ तसेच काझी मशिदीचे स.नं. ३ , ५ , ३५३ , ५४२ , ५६६ , ५४३ , ५५८ , ५४४ , ५५७ , ५४६ , ५४७ , ५५ ९ , ५६४ , ५६७ , ५६८ , ५ ९ २ , १३५ , १७३ , ९ ७४ , १७५ , १७६ , १८७ या सर्व्हे नंबर मध्ये जवळपास ५१५ एकर जमीन आहे.धारुर तालुक्यातील देवस्थानाच्या इनामी जमीनी विषयी झालेल्या फेरफार,रजिस्ट्री व पी.टी. आर . देणाऱ्या तत्कालीन तहसीलदार,मंडळ अधिकारी,तलाठी , रजिस्ट्री ऑफीस व नगर परिषद गैरव्यवर झाली आहे.व सदरील संपूर्ण जमीनीची विल्हेवाट संबंधीत अधिकारी यांनी पदाचा दुरुपयोग करुन लावलेली आहे.उच्चत्तम न्यायालय व शासन जी.आर.ची सुध्दा पायमल्ली करण्यात आलेली आहे . अंदाज 2 हजार एकर जमीन आहे मा.अप्पर जिल्हाधिकारी अंबाजोगाई व मा . उपविभागीय अधिकारी माजलगाव हे अधिकारी भूमाफियांना पाठीशी घालण्याचे काम करीत आहेत . धारुर एम.आय.डी.सी.ची • सुध्दा जमीन इनामी असून चालू असलेले काम तात्काळ थांबविण्यात यावे व या जमीनीवर स्टे – ऑर्डर देण्यात यावे.
त्याचप्रमाणे देवस्थाना बरोबर धारुर तालुक्यातील गायरान जमीनीची सुध्दा विल्हेवाट लावलेली आहे.राजपत्रात देवस्थानाची नोंद असलेल्या जमीनीची फेरफार आजसुध्दा चालू आहे तरी मंडळ अधिकारी यांनी तात्काळ नोंद घेणे बंद करावे . धारूर तहसील कार्यालय हे काही दलाल मंडळी व भूमाफिया यांच्या नियंत्रणात काम करीत आहे.धारूर तहसीलचे रेकॉर्ड रूम मध्ये सुध्दा मोठा गोंधळ निर्माण केलेला आहे व येथील अधिकाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कसलेच नियंत्रण नाही . यापूर्वी सुध्दा अनेक वेळा आंदोलने,निवेदन देवून सुध्दा या विषयी कसलीच कार्यवाही झालेली नाही.तरी झालेले बेकायदेशीर प्रकाराची सखोल चौकशी करुन दोषींवर योग्यती कार्यवाही करावी या प्रमुख मागणीसाठी आज सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर लोकतंत्रिक जनता दलचे जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम बापू यांच्या नेतृत्वाखाली लोकतांत्रिक जनता दलचे असंख्य कार्यकर्त्यांचा बेमुदत अमरण उपोषण सुरू आहे,

तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि लोकशाही न्युजला फॉलो करा

 

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button