क्राईमताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री वैशाली टक्करने राहत्या घरी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं


छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री वैशाली टक्करने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत सर्वांनाच धक्का दिला आहे.
अभिनेत्रीच्या कुटुंबियांसह तिच्या चाहत्यांनाही अद्याप या गोष्टीवर विश्वास ठेवणं कठीण झालं आहे. वैशालीने तिच्या इंदूरच्या राहत्या घरी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं आहे. वैशालीच्या खोलीतून पोलिसांना एक सुसाइड नोटही मिळाली आहे. या नोटमधून तिने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्याचं कारणही समोर आलं आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्याच कॉलनीत राहणाऱ्या एक्स बॉयफ्रेंडमुळे वैशालीने आत्महत्येसारखं मोठं पाऊल उचललं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फक्त वैशालीची सुसाइड नोटच नव्हे तर तिच्या खोलीतून मिळालेली तिची वैयक्तिक डायरीदेखील हेच सूचित करते की अभिनेत्रीने तिच्या एक्स बॉयफ्रेंडमुळे आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्रीच्या या एक्स बॉयफ्रेंडचं नाव राहुल नवलानी आहे. आणि तो बऱ्याच दिवसांपासून वैशालीला त्रास देत असे.

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत असे.

वैशालीचा एक्स बॉयफ्रेंड राहुल तिला लग्न करु देत नसल्याचं वैशालीच्या डायरीतून समोर आलं आहे. तो अभिनेत्रीला बऱ्याच काळापासून त्रास देत होता.

वैशाली सतत या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होती. परंतु जेव्हा कोणताच मार्ग मिळाला नाही तेव्हा कदाचित वैशालीला आत्महत्या हा एकमेव मार्ग समोर दिसला. दरम्यान, अभिनेत्रीच्या भावाने खुलासा करत राहुल हा नेमका कोण आहे? ज्याच्यामुळे वैशालीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं हे उघड केलं आहे.

या सर्व घटनेदरम्यान, वैशालीचा भाऊ नीरजने महत्वाची माहिती दिली आहे. भावाच्या म्हणण्यानुसार, राहुल आणि वैशालीचे वडील मित्र आहेत. राहुल आणि तिच्या वडिलांचा प्लायवूडचा व्यवसाय आहे. दोघे मिळून हा व्यवसाय चालवतात.

शिव शंकर प्लायवूड असं त्यांच्या दुकानाचं नाव आहे. याशिवाय राहुल लॅमनेट्स नावाने फर्मदेखील चालवतो. राहुल गेल्या 10-12 वर्षांपासून आपल्या कुटुंबासह इंदूरमधील त्याच सोसायटीत राहतो, ज्यामध्ये वैशाली तिच्या कुटुंबासह राहत होती.या दोघांचे वडील बिझनेस पार्टनर असल्याने त्यांच्या सततचा संपर्क होता. याबाबत सांगताना वैशालीचा भाऊ नीरजने सांगितलं की, ‘राहुल आमच्या सोसायटीत राहत होता.

तो आणि वैशाली दोघेही एकत्र जिमलासुद्धा जायचे. वैशालीने सांगितलं होतं की, राहुल तिला गेल्या अडीच वर्षांपासून त्रास देत आहे. याबाबतही आम्ही संवादही साधला होता. आम्हाला वाटलं की आम्ही सर्व काही सोडवू.

बोलून सर्वकाही सोडवता येईल. आम्ही विचार करत होतो की तो शेजारी आहे. त्यामुळे पोलिसांकडे जाणं योग्य होणार नाही. वैशाली आणि राहुल आधी एकत्र कुठेतरी गेले होते.

ज्याचे फोटो राहुलजवळ आहेत. या फोटोंच्या आधारे राहुल सतत वैशालीला धमकी देत असे. इतकंच नव्हे तर त्याने वैशालीचं लग्न होऊ देणार नसल्याचीही धमकी दिली होती.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button