बालाघाटावरील आतिवृष्टीग्रस्त शेतक-यांच्या बांधावर ; आ.संदिप क्षीरसागर ;जाधववस्तीवरील शेतक-याचे अश्रु पुसले – डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

बालाघाटावरील आतिवृष्टीग्रस्त शेतक-यांच्या बांधावर ; आ.संदिप क्षीरसागर ;जाधववस्तीवरील शेतक-याचे अश्रु पुसले :- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
___
मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतक-याच्या पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून आज दि.१६ ऑक्टोबर रविवार रोजी बीड विधानसभा मतदारसंघाचे आ.संदिप क्षीरसागर यांनी बालाघाटावरील लिंबागणेश सर्कल मधील मोरगाव ग्रामपंचायत अंतर्गत जाधववस्ती याठिकाणी तहसिल तसेच कृषि विभागातील आधिकारी ,कर्मचारी यांच्या समवेत बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. पावसाच्या तडाख्यामुळे शेतक-यांचे न भरून येणारे नुकसान झाले असून लवकरच मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,पालकमंत्री बीड यांची भेट घेऊन राज्यातील सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने नुकसान भरपाईची मागणी करणार असल्याची माहिती दिली.

जाधववस्तीवरील धायमोकलुन रडणा-या भारत जाधव यांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सुचना:- डाॅ.गणेश ढवळे
____
दि.११ ऑक्टोबर रोजीच्या पावसामुळे घरात गुडघाभर पाणी साचल्याने रात्र जागून काढलेल्या मोरगाव ग्रामपंचायत अंतर्गत जाधववस्तीवरील भारत जाधव शेतकरी कुटुंबांची व्यथा सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी सोशल मिडीयावर तसेच दैनिकातुन प्रसिद्ध केली होती. आज आपण.संदिप क्षीरसागर यांनी त्या कुटुंबाच्या घरी जाऊन भेट घेताच भारत जाधव यांना अश्रु अनावर झाले,धायमोकलुन रडत अश्रुंना वाट मोकळी करून देत ६ एकर शेतीमधील सोयाबीन पिकाचे नुकसानसह मांजरसुंभा-पाटोदा राष्ट्रीय महामार्गावरील कंत्राटदाराच्या चुकीमुळे घरातील लोकांवर गुदमरलेला प्रसंग सांगत मदतीची याचना केली. आ.संदिप क्षीरसागर यांनी तातत्काळ संबधित हुले कंत्राटदार यांना फोनकरून रस्त्याच्या बाजुला नाली बांधकाम करण्याच्या सुचना देत भारत जाधव यांना धीर दिला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे, बालाघाटावरील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आण्णा कागदे,आरूण रसाळ,विक्की वाणी,राहुल जाधव,संतोष वाणी,कृष्णा वायभट,तुकाराम मांडवे,विलास मांडवे,सुभाष मांडवे, रेवण मोरे,विशाल येडे,विलास घरत ,आदि उपस्थित होते.

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२