क्राईमताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेराजकीयसंपादकीय

ब्यूटी पार्लरमध्ये काम करताना ती सेक्स रॅकेट चालवत होती पुढे काय?


अर्चना धनाढ्य आणि प्रभावशाली व्यक्तींशी मैत्री करायची. अर्चनाच्या सेक्स रॅकेटची माहिती असल्याने हे लोक तिच्याकडे मुलींची मागणी करत. ती मुली पुरवून त्यांचे ‘त्या’ क्षणांचे चित्रीकरण करायची. व्हिडीओ उघड करण्याची धमकी देत खंडणी उकळायची.
अर्चनाकडे राजमहाल शोभावा असे आलिशान घर, परदेशातून आयात केलेल्या अंतर्गत गृहसजावटीच्या वस्तू, अनेक आलिशान कार, चार परदेशी कुत्रे आणि एक पांढरा घोडा आहे. आता तिच्या जीवनावर चित्रपट काढण्यात येणार आहे.भुवनेश्वर : राजकारणी, व्यापारी व चित्रपट निर्माते यांसारख्या धनाढ्य व प्रभावशाली ४५ लोकांनी एकांतात घालवलेल्या क्षणांची छायाचित्रे, व्हिडीओ उघड करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केल्याप्रकरणी पोलिसांनी २८ वर्षीय अर्चना नाग या तरुणीला अटक केली आहे

पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याने तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

पोलिसांनी आक्षेपार्ह व्हिडीओ असलेले पेन ड्राइव्ह आणि मोबाइल जप्त केले. यात अनेक चित्रपट निर्माते आणि राजकारण्यांचे व्हिडीओ असल्याचा संशय आहे. अर्चनाला गरिबीत आयुष्य जगायचे नव्हते. त्यामुळे तिने झटपट कमाईसाठी विलासी जीवनशैली जगण्यासाठी ‘अनैतिक’ मार्ग स्वीकारला.
अर्चनाचे २०१५ पूर्वीचे जीवन अतिशय हालाखीत गेले. तिची आई मिळेल ती कामे करून घराचा गाडा हाकत होती. अर्चना २०१५ मध्ये भुवनेश्वरला आली. प्रारंभी तिने एका सुरक्षा एजन्सीत काम केले आणि नंतर ब्यूटी पार्लरमध्ये काम करू लागली. २०१८ मध्ये तिने बालासोर जिल्ह्यातील जगबंधू चंद याच्याशी विवाह केला. याच ब्यूटी पार्लरमध्ये काम करताना ती सेक्स रॅकेट चालवत होती.

सरकार कोसळू शकते

अर्चनाचे सत्ताधारी खासदार व मंत्र्यांशी संबंध असल्याचे उघड झाल्यानंतर पटनायक सरकार कोसळू शकते, असा दावा विरोधी पक्ष काँग्रेसचे आमदार एस. एस. सलुजा यांनी केला आहे. पोलिसांनी अद्याप कोणाचेही नाव उघड केलेले नाही.

राज्यात खळबळ

जगबंधू व अर्चनाची काही आमदार आणि प्रभावशाली लोकांसोबतची छायाचित्रे व्हायरल झाल्यानंतर राज्यात खळबळ माजली आहे. तिने २०१८ ते २०२२ या चार वर्षांच्या काळात ३० कोटींची संपत्ती जमा केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button