बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ अनेक गावांचा संपर्क तुटला

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

परिसरातील शेकडो एकर शेतीतील पिके पाण्याखाली गेली आहे. सोयाबीन, कापूस, बाजरी यासह अन्य पिकांचं प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा निसर्ग संकटाने हिरावला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांची पुन्हा एकदा राख रांगोळी झाली असून येणारा दिवाळी सण कसा करावा? असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय. यामुळे मायबाप सरकारने याची दखल घेऊन तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

बीड : बीडच्या आष्टी तालुक्यातील पांढरी गावपरिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस तब्बल 4 तास पडलेल्या या पावसाने पांढरी गावासह बीड-अहमदनगर मुख्य महामार्गावर पाणीच पाणी झाले आहे. तर तालुक्यातील अनेक गावखेड्यातील नद्यांसह ओढ्यांना पूर आलाय. यामळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय.
बीड जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून परतीच्या पावसाने (Rain) धुमाकूळ घातला आहे. तर आज ढगफुटी सदृष्‍य पाऊस झाल्‍याने नदी- नाल्‍यांना मोठा पुर आला आहे. रस्‍त्‍यांवर देखील पाणी साचले असल्‍याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पांढरी गावासह बीड- अहमदनगर मुख्य महामार्गावर पाणीच पाणी असल्‍याने वाहतुक देखील विस्‍कळीत झाली आहे.