पंचकर्म केंद्रात बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथील महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने लोकांच्यात खळबळ उडाली. घटनास्थळी सातारा पोलिस दाखल

सातारा : सातारा येथील यवतेश्वर येथे असलेल्या आयुर्वेदिक केंद्रात परजिल्ह्यातील 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. पंचकर्म केल्यानंतर महिलेचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. शैलजा चौधरी असे मृत महिलेचे नाव आहे.

घटनास्थळावरू मिळालेली माहिती अशी, सातारा शहरापासून कास रोडला यवतेश्वर येथे एक प्रसिध्द पंचकर्म केंद्र आहे. येथे जिल्ह्यासह परजिल्ह्यातील लोक उपचारासाठी येत असतात. निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या या पंचकर्म केंद्रात बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथील महिला पंचकर्म करण्यासाठी आलेल्या होत्या. महिलेसोबत तिचे पती होते.

महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने लोकांच्यात खळबळ उडाली. घटनास्थळी सातारा पोलिस दाखल झाले असून अधिक माहिती घेत आहेत. महिलेचा मृत्यू नक्की कशाने झाला, याबाबत अधिक माहिती मिळाली नाही. परंतु मृत्यूबाबत पोलिस माहिती घेत आहेत.