ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

चमत्कार,आता आलीये उडणारी गाडी! चायनीज ‘फ्लाईंग कार’ ची पहिल्यांदाच भरारी


आपण एखाद्या ठिकाणी पोहचायला टॅक्सी, कार, बाईकने जातो. आता तसं आपल्याला हे सगळं नवीन नाही. असं म्हणतात की जेव्हा चाकाचा शोध लागला होता तेव्हा माणूस प्रचंड घाबरला होता. जेव्हा इंग्रज आले आणि भारतात ट्रेन घेऊन आले तेव्हाही लोक तितकेच घाबरले होते.



गाडीत बसायलाच लोकांचा नकार असायचा इतके लोक घाबरायचे. हळू हळू माणसाने इतकी प्रगती केली की त्या चाकांचं कायच्या काय करून टाकलं. आता इतक्या भन्नाट गाड्या पाहायला मिळतात. चाकाच्या गाडीत बसायला घाबरणारा माणूस आता स्वतःच त्या चाकाच्या गाड्या उडवतो. आता अजून एक चमत्कार आलाय, आता आलीये उडणारी गाडी! होय. दुबईमध्ये चायनीज ‘फ्लाईंग कार’ ने पहिल्यांदाच भरारी घेतलीये. आहेना इंटरेस्टिंग आणि भीतीदायक पण? तुम्हाला काय वाटतं माणूस घाबरेल ह्यात पण बसायला?

चिनी इलेक्ट्रॉनिक वाहन निर्माता कंपनीने तयार केलेल्या ‘फ्लाईंग कार’ ने आकाशात पहिल्यांदाच भरारी घेतलीये.

चिनी इलेक्ट्रॉनिक वाहन निर्माता कंपनी एक्सपेंग इंक (Chinese electronic vehicle maker Xpeng Inc) असं या कंपनीचं नाव आहे.

या कंपनीने तयार केलेल्या’फ्लाईंग कार’ ने संयुक्त अरब अमीरात (United Arab Emirates) आपले पहिले सार्वजनिक उड्डाण केले, ही कंपनी आंतरराष्ट्रीय बाजारात इलेक्ट्रिक विमाने लॉन्च करण्याच्या दिशेने काम करते.

X2 हे दोन सीट्स चे इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक-ऑफ आणि लँडिंग (EVTOL) विमान आहे जे वाहनाच्या प्रत्येक कोपऱ्यात दोन 8 प्रोपेलरने उचलले जाते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button