क्राईमताज्या बातम्यादेश-विदेश

डोक्यात बंदुकीच्या दोन गोळ्या,त्याच्यावर चाकूनेही वार हल्ल्यानंतरही….


थायलंडमध्ये पहिल्यांदाच शाळेच्या आवारात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. याआधीही 2020 मध्ये प्रॉपर्टी व्यवहारातून नाराज झालेल्या एका सैनिकाने गोळीबार केला होता. या गोळीबारात 29 लोकांचा मृत्यू झाला होता. तर 57 लोक जखमी झाले होते.बँकॉक : काही दिवसांपूर्वी गोळीबाराच्या घटनेनं थायलँड हादरलं. तब्बल 36 लोकांचा यात मृत्यू झाला आहे. पण दोन चिमुकल्यांचा जीव मात्र वाचला. त्यापैकी एका 3 वर्षांच्या चिमुकल्यावर इतका भयंकर हल्ला झाला होता की, त्याच्या डोक्यात बंदुकीच्या दोन गोळ्या होत्या, त्याच्यावर चाकूनेही वार केले होते.

या जीवघेण्या हल्ल्यानंतरही हा चिमुकला बचावला आहे. याला चमत्कारच म्हणावं लागेल. थायलंडमधील एका डे केअर सेंटरमध्ये माजी पोलिसाने गेल्या आठवड्यात गोळीबार केला. ज्यात कित्येक मुलं आणि शिक्षकांचा मृत्य झाला.

या दुर्घटनेत कमीत कमी 36 लोकांचा मृत्यू झाला आहे. पण दोन मुलांचा जीव मात्र वाचला. त्यापैकी एक मुलगी आणि हा मुलगा ज्याचं नाव सुमाई असं आहे. देव तारी त्याला कोण मारी असं म्हणतात ना, याचा प्रत्यय आला तो या सुमाईच्या बाबतीत.

डोक्यात दोन गोळ्या, त्यासोबत चाकूने हल्ला… अशा भयंकर हल्ल्यातून कुणाचा जीव वाचणं म्हणजे अशक्यच. पण एवढासा जीव सुमाई मात्र यातून बचावला. याला देवाचीच कृपा म्हणावी लागेल.डेली स्टारच्या रिपोर्टनुसार सुमाईच्या डोक्यातील गोळ्याही काढण्यात डॉक्टरांना यश मिळालं आणि त्याचा जीव वाचला. मुलाच्या आईने सांगितलं, जेव्हा तिला मुलावर भयंकर हल्ला झाल्याचं समजलं तेव्हा ती बेशुद्ध झाली. आपल्या मुलाचा मृत्यू झाला असंच तिला वाटलं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ड्रग्जशी संबंधित प्रकरणात पोलीस सेवेतून बडतर्फ केलेल्या हल्लेखोराने या गोळीबाळानंतर घऱी जाऊन आपली पत्नी आणि मुलाचीही हत्या केली आणि आत्महत्या केली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button