तलावात पडून आईसह तीन मुलींचा दुर्देवी मृत्यू

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


सांगली : सांगली जिल्ह्यात एक भयंकर घटना घडली आहे. जत तालुक्यातील बिळुर येथील तलावात पडून आईसह तीन मुलींचा दुर्देवी मृत्यू झाला.
घटनेने बिळूर आणि जत तालुक्यात शोककळा पसरली आहे. हा अपघात आहे की घातपात? हे अद्यापही समजलेलं नाही.
सुनीता माळी (वय 30), अमृता माळी (वय 13), अश्विनी माळी (वय 10), ऐश्वर्या माळी (वय 7) असं मृत्युमुखी पडलेल्या माय-लेकींची नावे आहेत. रविवारी रात्री उशीरा या चौघांचेही मृतदेह तलावाबाहेर काढण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, जत तालुक्यातील बिळुर येथील सुनीता माळी या कपडे धुण्यासाठी मुलींसह गावाजवळील तलाव परिसरात गेल्या होत्या. रविवारी रात्री या चौघींचेही मृतदेह तलावाच्या पाण्यात आढळून आले.
दरम्यान, गावकऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आईसह तीन मुलींचे मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आले असून हा अपघात आहे की घातपात याबाबतचा तपास पोलीस करीत आहेत.