ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेराजकीय

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यांचे निधन


55 वर्षांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय असलेले मुलायम सिंह यादव यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1939 रोजी इटावा जिल्ह्यातील सैफई येथे झाला. त्यांनी राज्यशास्त्रात एमए केले. 1967 मध्ये यूपीमधील जसवंत नगरमधून आमदार निवडून आल्यानंतर ते पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले आणि त्यानंतर त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत मागे वळून पाहिले नाही. ते आठ वेळा आमदार म्हणून निवडून आले आणि सात वेळा निवडून येऊन लोकसभेचे खासदार झाले. 1996 मध्ये त्यांना संयुक्त आघाडी सरकारमध्ये संरक्षण मंत्री होण्याची संधीही मिळाली.

समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यांचे निधन झाले आहे. सोमवारी सकाळी मेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून आजारी होते.
त्यांचे वय ८२ होते. उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात ते ‘नेताजी’ या नावाने प्रसिद्ध होते.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलायम सिंह गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांचे कुटुंबिय त्यांना तीन महिन्यांपूर्वीच मेदांता रुग्णालयात घेवून आले होते. मेदांता रुग्णालयात पूर्ण चेकअप केल्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती 2 ऑक्टोबरला सकाळपर्यंत ठीक होती.

मात्र, त्याचदिवशी दुपारी अचानक त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तातडीने मेदांता रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button