बसने पेट घेतल्याने,अडकलेले प्रवासी आगीमुळे जळून खाक

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

नाशिक : औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर लक्झरी बस आणि टँकर यांच्यात शनिवारी पहाटे 5 वाजून 15 मिनिटाच्या सुमारास भीषण अपघातात झाला.
घेतला. या आगीत बसमधील जवळपास दहा प्रवासी जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यवतमाळ येथून बस मुंबईकडे जात असताना सदर अपघात घडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. घटनास्थळी अग्निशमन दलाची तीन ते चार वाहनं तसेच चार ते पाच रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या.

साधारणपणे अर्धा तासाहून अधिक काळ पेटलेली बस विझवण्याचा प्रयत्न सुरू होता. बस पेटल्यानंतर ज्या प्रवाशांना बसमधून खाली उतरता आलं त्यांनी उड्या मारल्या तर आतमध्ये अडकलेले प्रवासी आगीमुळे जळून खाक झाले. या घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.
सदर अपघातानंतर बस 50 ते 60 फूट पुढे घसरत गेली तर टँकर 70 ते 80 मीटर पुढे जाऊन थांबला.

या अपघातात बसने पेट घेतल्याने जळून मयत झालेल्या नागरिकांचे मृतदेह महापालिकेच्या सिटी लिंक बसमधून हलविण्यात आले. या घटनेत 10 लोक जळून खाक झाले तर 34 जणांवर उपचार सुरू आहेत. सदर अपघात घडल्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या काही नागरिकांनी नवीन आडगाव नाक्यावर असलेल्या वाहतूक पोलीस चौकीत धाव घेतली.
तसंच पोलिसांना याबाबत कळवलं. मात्र, पोलीस वेळेत घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.