इन्स्टाग्रामवर ओळख,तरुणीची तब्बल सहा लाख ४९ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

जळगाव : इन्स्टाग्रामवर ओळख करून ‘तुला गिफ्ट पाठवतो’ असे सांगून तरुणीची तब्बल सहा लाख ४९ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
प्रकरणी बुधवारी (ता. ५) सायंकाळी पाचला अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे

यावल पोलिस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या २७ वर्षीय तरुणीशी ऑगस्ट २०२२ मध्ये डॉ. मार्क नावाच्या व्यक्तीने इन्स्टाग्रामवर ओळख निर्माण करून मैत्री केली.
त्यानंतर त्याने तरुणीचा व्हॉट्‍सॲप नंबर मिळविला. त्यानंतर तरुणीचा विश्वास संपादन करून गिफ्ट पाठवीत असल्याचे सांगून वेळोवेळी तरुणीकडून तब्बल सहा लाख ४९ हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांवर मागविले.

तसेच पैसे ऑनलाइन स्वीकारून कोणतेही गिफ्ट न पाठविता तरुणीची फसवणूक केली. या प्रकरणी फसवणूक करणाऱ्या डॉ. मार्क नामक व्यक्तीविरोधात जळगाव सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे तपास करीत आहेत.