पाकिस्तानला F-16 लढाऊ विमानासाठी 450 दशलक्ष डॉलर्सच्या उपकरणे खरेदी करण्यास मान्यता

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2018 मध्ये पाकिस्तानला सर्व संरक्षण आणि सुरक्षा सहाय्य स्थगित करण्याची घोषणा केल्यानंतर पाकिस्तानला दिलेली ही पहिली मोठी सुरक्षा मदत आहे. 2018 मध्ये ट्रम्प प्रशासनाने दहशतवादी गट, अफगाण तालिबान आणि हक्कानी नेटवर्कवर कारवाई करण्यात अपयशी ठरल्याबद्दल पाकिस्तानला सुमारे 2 अब्ज डॉलरची आर्थिक मदत थांबवली होती.

अमेरिकेने F-16 फायटर जेट फ्लीटच्या देखभालीसाठी पाकिस्तानला USD 450 मिलीयन (रु. 3600 कोटी) ची मदत मंजूर केली आहे. बिडेन प्रशासनाने ट्रम्प प्रशासनाचा निर्णय फिरवत पाकिस्तानला F-16 लढाऊ विमानासाठी 450 दशलक्ष डॉलर्सच्या उपकरणे खरेदी करण्यास मान्यता दिली आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

अमेरिकेकडून पाकिस्तानला ही आर्थिक मदत दिली जात आहे जेणेकरून ते सध्याच्या आणि भविष्यात दहशतवादविरोधी धोक्यांचा यसस्वीपणे सामना करू शकतील. गेल्या चार वर्षांत पाकिस्तानला दिलेली ही सर्वात मोठी सुरक्षा मदत आहे. F-16 फायटर जेटच्या मदतीने पाकिस्तानने भारताचे मिग-21 विमान पाडल होते असे मानले जाते.

अल कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरीवरील हल्ल्यात मदत केल्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानला ही भेट दिली असल्याचे बोलले जात आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने सांगितले की, त्यांनी पाकिस्तानला F-16 लढाऊ विमानांच्या देखभालीसाठी संभाव्य विदेशी लष्करी विक्रीला मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरुन पाकिस्तानी हवाई दलाला सध्याच्या आणि भविष्यातील दहशतवादाच्या धोक्यांना प्रतिसाद देण्याची क्षमता टिकवून ठेवण्यात मदत होईल.