ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये कांटे की टक्कर,पेशावर शहरात 2 जणांचा मृत्यू


पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना जितका रोमांचक होता, तितकाच खळबळजनक प्रकारही घडला आहे. सामन्यादरम्यानच एका पाकिस्तानी खेळाडूची अफगाणिस्तानच्या खेळाडूसोबत बाचाबाची झाली. तो अफगाणिस्तानच्या खेळाडूला बॅटने मारण्यासाठीही धावला. पाकिस्तानच्या विजयाने संतप्त झालेल्या अफगाणिस्तानच्या चाहत्यांनी खुर्च्या फोडून पाकिस्तानी चाहत्यांना मारहाण केली. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

क्रिकेट हा खेळ आशिया खंडात सर्वाधिक चर्चेत असणारा विषय आहे. क्रिकेट सामने पाहण्यासाठी लोकं खास वेळ काढतात. कधीकधी तर पराभव लोकांच्या इतका मनाला लागतो की, ते मैदानावर विरुद्ध संघाच्या चाहत्यांवर देखील भडकतात आणि वाद होतात.
आशिया कपच्या (Asia Cup 2022) सुपर-4 फेरीत पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळाली. पण यामध्ये दोन जणांना जीव गमवावा लागला आहे. विजय साजरा करताना ही घटना घडली. (Two persons in Pakistan were killed as the citizens celebrated the cricket victory)

पाकिस्तानातील पेशावरमध्ये संघाच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या लोकांनी हवेत गोळीबार केला. या गोळीबारात जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान (Pak vs afg) सामन्यादरम्यान मैदानावरील खेळाडूंमध्ये ही वाद पाहायला मिळाला. स्टेडियममध्ये देखील काही लोकं एकमेकांना भिडली.

पाकिस्तानातील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संघाच्या विजयाचा आनंद साजरा करताना अनेक शहरांमध्ये हवाई गोळीबार करण्यात आला. पेशावर शहरात 2 जणांचा मृत्यू झाला आहे, तर पोलिसांनी गोळीबाराच्या आरोपाखाली सुमारे 41 जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पेशावरमधील मतनी अदेजाई भागात घडली. काही लोक गोळीबार करून आनंद साजरा करत होते. ज्यामुळे दोघांचाही मृत्यू झाला. अनेक शहरांमध्ये अशी घटना समोर आली असून, त्यानंतर 41 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पाकिस्तानच्या विजयानंतर हवाई गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला आहे. यानंतर मृतांच्या नातेवाईकांनी आणि स्वयंसेवी संस्थांनी अवैध शस्त्राविरोधात मोहीम राबवण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानची अवस्था अशी आहे की येथे खुलेआम अवैध शस्त्रे विकली जातात. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर फळे, भाजीपाला असा बेकायदेशीर शस्त्रांचा बाजार सजला आहे. याबाबत अनेकदा आंदोलने झाली, मात्र ती थांबू शकली नाही. त्यामुळेच पाकिस्तानमध्ये अवैध शस्त्रांनी गोळीबार करण्याच्या घटना वारंवार समोर येतात.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button