करूणा मुंडे यांच्याविरोधात,आर्थिक फसवणुकीसह धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

संगमनेर : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी आणि सामाजिक कार्यकर्त्या करुणा मुंडे यांची 30 लाख रुपयांना फसवणूक केल्याचे प्रकरणी समोर आले होते.

आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. करुणा शर्मा यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्या आला आहे. संगमनेरमध्ये करूणा मुंडे यांच्याविरोधात संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक फसवणुकीसह धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

धनंजय मुंडे यांच्याविरोधात नवा पक्ष काढण्यासाठी फिर्यादीकडून लाखो रुपये घेतल्याचा आरोप करुणा शर्मा यांच्यावर करण्यात आला आहे. २२ लाख ४५ हजार रोख आणि १२ लाखांचे सोने घेतल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. उसनवारी म्हणून दिलेली रक्कम आणि सोने परत दिले नाही म्हणून गुन्हा दाखल केला आहे. संगमनेर तालुक्यातील कोंची येथील फिर्यादी भारत भोसले यांनी हा आरोप केला आहे.

भोसले यांच्या फिर्यादीवरून ४२०, ५०६ कलमान्वये करुणा शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ७ जानेवारी ते २५ फेब्रुवारी २०२२ दरम्यान व्यवहार झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. काही दिवसांपूर्वी करुणा मुंडे यांनी देखील भारत भोसले यांच्या विरोधात ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद दिली होती. संगमनेर पोलीस ठाण्यात भोसलेंविरोधात ऑगस्ट महिन्यात तक्रार दाखल केली आहे.

आमच्या कंपनीत पैसे गुंतवा, दुप्पट करून देतो असे सांगून भोसले आणि इतर दोघांनी फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. त्यामुळे करुणा मुंडे यांनी संबंधितांकडे या पैशांबाबत विचारणा केली असता त्याने मुंडे यांना उडवाउडवीचे उत्तरे दिली. इतकेच नव्हे तर खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची आणि बदनामी करण्याची धमकीही दिली, असे करुणा मुंडे यांनी आपल्या फिर्यादित म्हटले आहे कोण आहेत करुणा शर्मा-मुंडे? करुणा शर्मा या आपण धनंजय मुंडे यांची पत्नी असल्याचा दावा करतात. विशेष म्हणजे, धनंजय मुंडे यांनीदेखील गेल्यावर्षी फेसबुक पोस्ट टाकून आपण करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबत परस्पर सहमतीने संबंधात असल्याचं कबूल केलं होतं.

तसेच त्यातून आपल्याला दोन अपत्य देखील असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी मोठा गदारोळ झाला होता.करुणा शर्माची बहीण रेणू शर्माने धनंजय मुंडे यांच्याविरोधात मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.