बीड विषारी अळीनं चावा घेतल्यानं तीन शेतकऱ्यांना त्रास,रुग्णालयात भरती

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


बीड जिल्ह्यात आता शेतकऱ्यांपुढं नवीन अस्मानी संकट आलं आहे. या घोणस अळीने चावा घेतल्यास असाह्य वेदना अन उलट्या होत आहेत. दरम्यान, जिथे ही अळी आढळली तिथे जाऊन कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी पाहणी करणार असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. शेतकऱ्यांना देखील काळजी घेण्याचं आवाहन कृषीमंत्र्यांनी केलं आहे.

बीड : शेतकऱ्यांसमोर सातत्यानं नवनवीन संकट येत आहेत. कधी नैसर्गिक संकट तर कधी सरकारी धोरण हे कायम चालूच आहे.

अशातच आता शेतकऱ्यांसमोर घोणस नावाच्या अळीचं नवं संकट उभं राहिलंय. या घोणस अळीचा (Ghonas worms) परिणाम केवळ पिकावरच नाही तर माणसांवर देखील होताना पाहायला मिळतोय. बीड (Beed जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात हा प्रकार उघडकीस आला आहे. शिराळा गावात ही घोणस अळी चावल्यानं शेतकऱ्यांना रुग्णालयात भर्ती करण्याची वेळ आली आहे.
दिवसेंदिवस वातावरणात बदल होत आहे. या वातावरणातील बदलांचा परिणाम शेतकऱ्यांच्या पिकांवर होत आहे. पिकांवर विविध प्रकारच्या कीड पडत आहेत. मात्र, घोणस नावाची एक अळी जी गवतावर आणि ऊसावर पाहायला मिळते तिचा परिणाम केवळ पिकांवर नाही तर माणसांवर देखील होत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे. घोणस नावाची विषारी अळी अंगावर पडून तिने चावा घेतल्यानं असह्य वेदना झाल्यानं तीन शेतकऱ्यांना रुग्णालयात भरती होण्याची वेळ आली आहे. यामुळं शेतकरी वर्गाच्या मनात धडकी भरली आहे. हा प्रकार बीडच्या आष्टी तालुक्यातील शिराळा गावात उघडकीस आला आहे.