महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती होणार?

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


राज्यात लवकरच होणार असलेल्या वेगववेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर ही युती जाहीर होण्याची शक्यता आहे.

मागील काही दिवसांत भारतीय जनता पार्टीकडून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटींमुळेच भाजप आणि मनसे युती करणार असल्याची चर्चा जोर रू लागली आहे.

भाजपने आधीच शिंदे गटाच्या माध्यमातून शिवसेनेत फूट पाडली आहे. आता मनसेसोबत युती करून भाजप राज्यातील राजकीय पकड आणखी मजबूत करण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आहे. लवकरच मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच भाजप नेत्यांची मनसेसोबतच्या युतीची चाचपणी सुरू केल्याची चर्चा आहे.

आधी मराठीचा मुद्दा घेऊन राजकारण सुरू करणाऱ्या मनसेने काही महिन्यांपूर्वी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेण्यास सुरुवात केली आहे. याच कारणामुळे भाजप आणि मनसे यांच्या युतीची शक्यता निर्माण झाली आहे.

गणेशोत्सवात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते निवडक ठिकाणी गणपती दर्शन घेणार आहेत तसेच भाजप नेत्यांशी चर्चा करणार आहेत. अमित शहांच्या या दौऱ्यारम्यान भाजप-मनसे युतीबाबत महत्त्वाची चर्चा आणि निर्णय होण्याची शक्यता आहे.