गावात 6 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


धक्कादायक घटनेनं संपूर्ण तुळजापूर हादरलं आहे. तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ गावात 6 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार करण्यात आला आहे.
मुलीवर तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. गावकऱ्यांनी एका आरोपीला अटक करुन पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. तुळजापूर पोलिसांनी या प्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

तुळजापुरात (Tuljapur Crime) घडलेल्या घटनेनं संपूर्ण राज्य हादरलं आहे. अवघ्या 6 वर्षांच्या चिमुकलीवर नराधमांनी पाशवी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नराधमांनी मुलीच्या गुप्तांगावर वारही केले असून पीडित चिमुकली गंभीर जखमी आहे. चिमुकली घराच्या पाठीमागच्या आवारात खेळत असताना नराधमांनी संधी साधली. खेळत असलेल्या चिमुकलीला बाजूच्या शेतात नेलं. तिथे नराधमांनी चिमुकलीवर अत्याचार केला. एवढ्यावरच नराधम थांबले नाहीत, तर त्यांनी चिमुकलीच्या गुप्तांगावर वारही केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडित मुलीवर सध्या तुळजापूरच्याच उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती गंभीर आहे.

घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच त्यांनी एका आरोपीला अटक करुन पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. तुळजापूर पोलिसांत पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

महिला बाल हक्क आयोगाच्या सदस्यांनी घेतली पीडीतेची भेट

तुळजापूर तालुक्यातील एका अवघ्या सात वर्षांच्या चिमुरडीवर पाशवी अत्याचार झाल्याची घटना दुर्दैवी आहे. या गुन्ह्यातील नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं महिला बाल हक्क आयोगाच्या सदस्य ॲड. प्रज्ञा खोसरे यांनी सांगितलं आहे. त्यांनी आज पीडितेची भेट घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यात काल सात वर्षांच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तर पीडित मुलीवर तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर अतिरक्तस्राव झाल्यामुळे उस्मानाबाद येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात हलविण्यात आलं आहे.