वेश्या व्यवसाय करण्यासाठी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची विक्री

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


जळगाव : वेश्या व्यवसाय करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील एका गावात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्वसनिय सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील १७ वर्षीय मुलगी वास्तव्याला आहे. दरम्यान, जळगावातील लक्ष्मी मावशी नामक महिलेने तिच्या दिराच्या शालकाशी २३ ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलीशी लग्न लावून देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पिडीत मुलीने कशीबशी आपला सुटका करून थेट एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. आपल्याला वेश्या व्यवसाय करण्यासाठी विक्री केल्याची धक्कादायक माहिती पिडीत मुलीने पोलीसांसमोर कथन केले. यासंदर्भात पिडीत मुलीने एमआयडीसी पोलीसात चौघांविरोधात तक्रार दिली. त्यानुसार लक्ष्मीमावशी नामक महिला, तिचा दिर विजय, विजयची पत्नी, दिराचा शालक या चार जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवारी ३० ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे करीत आहे.