१५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


जळगाव : रामानंदनगर परिसरातील म्यूनसिपल कॉलनीत राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करत पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रामानंदनगर परिसरातील म्यून्सिपल कॉलनी १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २९ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला काहीतरी फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार घडला. मुलीच्या नातेवाईकांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला परंतू मुलगी कुठेही आढळून आली नाही. अखेर मंगळवारी ३० ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहे.