बीड भरधाव ट्रकने कारला धडकले

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


गेवराई बीड हायवे वर भारत पेट्रोलियम जवळ भरधाव ट्रकने कारला धडक दिली. या अपघातामध्ये कार पलटी झाली असून कारमधील दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. स्‍थानिक नागरिकांनी जखमींनी तात्‍काळ रूग्‍णालयात दाखल केले.
याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, एम एच,14 डी एक्स 8891 क्रमांकाची कार बीडकडून गेवराईकडे येत होती. दरम्‍यान, पाठीमागून येणाऱ्या ट्रकने ओहर टेक करण्याच्या नादात जोराची धडक दिली. यामध्ये कार जाग्यावर पलटी झाली असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांना माहिती दिली असून ट्रक चालक मात्र गाडी सोडून फरार झाला. सदरील घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.