मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार असे आहेत ज्यांनी मोठा संघर्ष केला आहे. संघर्ष करुनच ते आज मोठे झाले आहेत. अनेकांचा संघर्ष हा प्रेरणा देणारा आहे. मुंबईत ज्यांच्याकडे राहायला घर नव्हतं त्यांच्याकडे आज मुंबईत महागडी घरे आहेत.
अशाच एका सेलिब्रिटीबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. ज्यांनी एकेकाळी घरकाम करुन पोट भरले आहे.
बॉलिवूडच्या अभिनेत्री शशिकला हे आज आपल्यामध्ये नाहीत. पण अनेक सिनेमांमध्ये त्यांची भूमिका लोकप्रिय ठरली होती. शशिकला यांनी 70 च्या दशकात नाव कमवलं. सौंदर्यासोबत त्यांचा अभिनय अनेकांना आवडायचा. पण हा प्रवास इतका सोपा नव्हता. अतिशय गरिबीत त्यांनी संघर्ष करत यश मिळवलं.
शशिकला यांचे वडील मोठे व्यावसायिक होते. पण नंतर ते आर्थिक संकटात सापडले आणि गरीबीचे दिवस पाहावे लागले. शशिकला यांना अभिनयाची आवड होती. पण सर्व काही गमावल्यानंतर ते सोलापूरहून मुंबईला आले.
शशिकला यांना त्यावेळी उदरनिर्वाह करण्यासाठी लोकांच्या घरी जाऊन कामं करावी लागली. त्यानंतर त्यांनी नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
शशिकला यांच्यावर नूरजहाँ यांची नजर पडली आणि त्यांना चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही.