क्राईमताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

पत्नी वारंवार माहेरी जायची आधी मारहाण, मग डोळाच बाहेर काढला


छत्तीसगड : पत्नी वारंवार माहेरी जायची म्हणून संतापलेल्या पतीने बोट घालून पत्नीचा डोळा (Eye)च बाहेर काढल्याची भयानक घटना छत्तीसगडमध्ये घडली आहे.महिलेला गंभीर अवस्थेत मेडिकल कॉलेज रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून उदयपूर पोलीस ठाण्यात आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल (Case Filed) करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाच्या प्रयत्ना (Attempt to Murder)चा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. सध्या आरोपी फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, आरोपीला अंमली पदार्थांचे व्यसन आहे. यामुळेच त्याचे पत्नीसोबत अनेकदा भांडण होत होते. देवीप्रसाद असे आरोपीचे नाव आहे.

आधी मारहाण केली, मग डोळा बाहेर काढला

छत्तीसगडमधील सुरगुजा जिल्ह्यातील उदयपूर पोलीस स्टेशन अंतर्गत केशगवान देवीप्रसाद आणि मानमती हे दोघे कुटुंबासोबत राहत होती. केशगव्हाण येथील रहिवासी असलेल्या देवप्रसादने नशेच्या अवस्थेत घरी पोहोचून पत्नी मानमतीशी सारखी माहेरी का जाते ? यावरून वाद घालण्यास सुरुवात केली. दोघांमधील वाद इतका वाढला की, आधी देवीप्रसादने पत्नी मानमतीला अर्धमेली होईपर्यंत मारहाण केली. त्यानंतर उजव्या डोळ्यात बोट घालून डोळा बाहेर काढला. एवढेच नाही तर त्याने डोळ्याच्या नसा कापल्या आणि मग डोळा आगीत टाकला. यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला.

पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या सासू आणि दिराने डायल 112 वर घटनेची माहिती दिली. डायल 112 च्या टीमने माहिती मिळताच पीडितेला प्रथम उदयपूरच्या रुग्णालयात नेले. मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला तात्काळ अंबिकापूर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले. तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button