क्राईमताज्या बातम्याबीडमहत्वाचेमहाराष्ट्र

बीड सोन्याचे आमिष दाखवून 2 जणांना तब्बल 16 लाखाला फसवले


बीड : सोन्याचे ( fake gold) आमिष दाखवून 2 जणांना तब्बल 16 लाखाला फसवण्यात आल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील सिरसाळ्यात घडली आहे. एकाला 14 लाखाला तर दुसऱ्याला अडीच लाखाला फसवल्याचा प्रकार समोर आला आहे.



दोन्ही तक्रारी लक्षात घेता मोठी टोळी सक्रीय असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिरसाळ्यात आणि परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून चोरटयांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. कुठे मोबाईल चोरी, केठे वाहन चोरी,कुठे म्हैस, शेळी, वाहन चोरी अशा विविध प्रकारच्या चोऱ्या होत आहे. पण यात आता बनावट सोने देऊन केलेली फसवणूक तर खूपच गंभीर प्रकार आहे.
शहरात दोन व्यक्तींना सोन्याचे आमिष दाखवून तब्बल 16 लाखाला फसवण्यात आले आहे. सोने देण्याचे आमिष देऊन त्यांच्याकडून पैसे उकळण्यात आले. यामध्ये एका जणांला तब्बल 14 लाखांना गंडा घातला आहे. तर दुसऱ्या एका व्यक्तीला अडीच लाखाला फसवले आहे.

या प्रकरणी सिरसाळा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, घरबांधकामासाठी बँकेतून एक लाख रुपये काढून गावाकडे निघालेल्या वृद्धाची दुचाकी अडवून मारहाण करत लुटल्यची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बीडच्या मांजरसुंबा- ससेवाडी रस्त्यावर घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली असून नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. बारिकराव अंबादास घरत असे वृद्धाचे नाव आहे.

याप्रकरणी नेकनूर पोलीस आहेत अज्ञात तिघाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाजनवाडी येथील बारिकराव अंबादास घरत यांनी नवीन घराचे बांधकाम सुरू असल्याने पैसे कमी पडल्याने मांजरसुंबा येथे एसबीआयमधून एक लाख रुपये काढून ते दुचाकीवरून गावी जाण्यास निघाले. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मांजरसुंबा- ससेवाडी रस्त्यावरील पुलावर त्यांना अज्ञात तीन जणांनी रोखले. मारहाण करुन बळजबरीने दोन अंगठ्या व रोख एक लाख रुपये असा एक लाख ४८ हजार रुपयांचा ऐवज घेऊन तिघांनी दुचाकीवरून मांजरसुंबा मार्गे धूम-स्टाइल पोबारा केला. याप्रकरणी घरत यांच्या फिर्यादीवरून नेकनूर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button