“मी नामर्द आहे, त्यामुळे सेक्स करू शकत नाही.” – डेविन

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


हॉलिवूडमधून मोठी बातमी समोर येत आहे. सन 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘होम अलोन’ या हॉलिवूडच्या प्रसिद्ध चित्रपटातील मुख्य अभिनेता केविनच्या मोठ्या भावाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अडचणीत सापडला आहे.
अभिनेता डेविन रेट्रे याच्यावर न्यूयॉर्कमध्ये एका महिलेवर लैंगिक अत्या’चार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोप लावणाऱ्या महिलेने सांगितले आहे की, सन 2017मध्ये डेविनने त्याच्या मॅनहॅटन येथील अपार्टमेंटमध्ये नशेच्या स्थितीत अं’मली पदार्थ देऊन लैंगिक अत्या’चार केला होता.

आधीपासूनच कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात अडकलाय डेविन रेट्रे
अभिनेता डेविन रेट्रे (Devin Ratray) याने महिलेने लावलेल्या आरोपांचे खंडन केले आहे. डेविनला सध्या एका वेगळ्या कौटुंबिक हिंसाचाराच्या खटल्याचा सामना करावा लागत आहे. त्याच्या अटकेनंतर पीडित महिलेने सरकारी वकिलाशी संपर्क साधला आणि विचारले की, तिच्या रिपोर्टच्या आधारावर लैंगिक अत्या’चाराचा तपास का झाला नाही. तिचे म्हणणे आहे की, अधिकाऱ्यांना असे वाटले की, तिला तिची ओळख लपवायची आहे.
स्वत:च सांगितले रात्री घडलेला प्रकार
पीडित महिलेने सांगितले की, लैंगिक अत्या’चार करण्यापूर्वी ती 15 वर्षांपर्यंत डेविन रेट्रे याची मैत्रीण राहिलीये. तिने पुढे सांगितले, एका पार्टीत दारू पिल्यानंतर त्याचा भाऊ आणि मित्रासोबत ती डेविनच्या फ्लॅटवर गेली होती. तिथे डेविनने तिला आणखी दारू पाजली आणि त्यात काहीतरी मिसळवले होते. ती म्हणाली, “मला आठवते की, मी जागीच होते, पण हलू शकत नव्हते. मी माझे डोळेही उघडू शकत नव्हते. मात्र, मला जाणवत होते की, माझ्यासोबत काय होत आहे.” याविषयी तिने दुसऱ्या दिवशी डेविनला विचारणा केली असता, त्याने आरोपांचे खंडन करत म्हटले की, “मी नामर्द आहे, त्यामुळे सेक्स करू शकत नाही.”

‘मी तिच्यासोबत सेक्स केला नाही’
मात्र, आतापर्यंत पीडित महिलेच्या आरोपांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाहीये. जेव्हा डेविन रेट्रे याला याबद्दल विचारणा केली, तेव्हा त्याने सांगितले की, त्या रात्री त्याने तिच्यासोबत सेक्स केला नव्हता. यासोबतच डेविनने स्वत:वर लावलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या आरोपांचेही खंडन करण्याची मागणी केली. आता डेविनच्या प्रकरणाची सुनावणी ऑक्टोबर महिन्यात होणार आहे.