क्राईमताज्या बातम्यादेश-विदेश

आबे यांची हत्या कशी झाली?हल्लेखोराचा पोलिसांजवळ खळबळजनक खुलासा


टोकियो : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे(Former Japanese Prime Minister Shinzo Abe)यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. 8 जुलै रोजी त्यांच्या हत्येचे वृत्त प्रसारीत झाले आणि जपानसह संपूर्ण जग हादरले.
भारताशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबध होते. पोलिसांनी तात्काळ शिंजो आबे यांना गोळ्या घालणाऱ्या आरोपीला अटक केली. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या शिंजो आबे यांचा मारेकरी तेत्सुया यामागामी(Tetsuya Yamagami) याने हत्येबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे. शिंजो आबे हे माझे शत्रू नव्हते. मात्र, माझ्या आईमुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं असल्याचा दावा या मारेकऱ्याने केला आहे. आबे याची हत्या करण्यामागे मारेकऱ्याने पोलिसांना सांगीतलेले कारण अत्यंत धक्कादायक आहे.



आबे यांची हत्या कशी झाली?

8 जुलै रोजी आबे यांची नारा शहरात प्रचारसभा आयोजिण्यात आली होती. त्याचवेळी त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला. तेत्सुया यामागामी या हल्लेखोराने आबे यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर आबे जागीच कोसळले. आबे यांना हेलिकॉप्टरद्वारे तातडीने नारा वैद्यकीय विद्यापीठाच्या रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. अखेरीस सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. हल्लेखोर यामागामीने डबल बॅरेलची हँडमेड गनने आबे यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केली.

हल्लेखोराचा पोलिसांजवळ खळबळजनक खुलासा

आईच्या दान करण्याच्या सवयीमुळे माझ्यावर आबे यांची हत्या करण्याची वेळ आल्याचे तेत्सुया यामागामी याने पोलिसांना सांगीतले . एकेकाळी करोडोंच्या संपत्तीचा वारस असणारा तेत्सुया यामागामी आईच्या दान करण्याच्या सवयीमुळे इतका गरीब झाला की त्याच्यावर अन्नासाठी भिक मागण्याची वेळ आली .

युनिफिकेशन चर्चमुळे माझं आयुष्य बरबाद झालं

युनिफिकेशन चर्चमुळे माझं आयुष्य बरबाद झाल्याचे तेत्सुया याने सांगीतले. या चर्चची स्थापना 1954 मध्ये दक्षिण कोरियामध्ये झाली होती. 1980 च्या दशकापासून या चर्चवर आपल्या भक्तांकडून लाखोंच्या देणग्या घेतल्याचा आरोप आहे. या चर्चमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. त्याच्या आईने युनिफिकेशन चर्चला दिलेल्या मोठ्या देणगीमुळे त्याचे कुटुंब आणि जीवन नष्ट झाले असल्याचे त्याने असोसिएटेड प्रेसला लिहिलेल्या पत्रात आणि ट्विटमध्ये म्हंटले आहे. ॉ

लहानपणी वडिलांची हत्या

यामागामी 4 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांची हत्या झाली. यानंतर त्याची आई युनिफिकेशन चर्चमध्ये सामील झाली. आईने भरपूर पैसा चर्चला दान करत होती. देणग्यांमुळे कुटुंबाचे दिवाळे निघाले. यामागामीला कॉलेज अर्धवट सोडावे लागले. त्याच्या भावाने देखील आत्महत्या केली.

चर्चच्या संस्थापकाच्या पत्नीला मारण्याची योजना होती

यामागामीने पोलिसांना सांगितले की त्याने चर्चच्या संस्थापकाची पत्नी हक जे हान मून हिच्या हत्येचा कट रचला होता. मात्र जपानमध्ये आलीच नाही. आबे माझे मुख्य शत्रू नव्हते. ते युनिफिकेशन चर्चच्या सर्वात प्रभावशाली समर्थकांपैकी एक होते यामुळे मी त्यांची हत्यातेल्याचे मारेकऱ्याने पोलिसांना सांगीतले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button