क्राईमताज्या बातम्यापुणेमहत्वाचेमहाराष्ट्र

महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार,सदनिकेत कोंडून ठेवलं.


पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळं खळबळ उडाली आहे.. एका सेल्स मॅनेजरने बीएएमएस महिला डॉक्टरवर (BAMS Doctor) बलात्कार केल्याची घटना घडलीय. नराधम (sales manager) सेल्स मॅनेजरने पीडित महिलेला एका सदनिकेत कोंडून ठेवून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
आरोपीने पीडितेला लग्नाचं आमिष देऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पीडित महिला डॉक्टरने आरोपी विरोधात पिंपरी पोलीस (Pimpari Police) ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी तातडीनं आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. अंजिम नूर मोहम्मद तांबोळी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,पिंपरी चिंचवड शहरात एका सेल्स मॅनेजरने बीएएमएस महिला डॉक्टरवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लग्नाचं आश्वासन देऊन सेल्स मॅनेजरने पीडित महिला डॉक्टरवर बलात्कार केला.सन २०१९ पासून ते २५ ऑगस्ट २०२२ पर्यंत संत तुकाराम नगर येथील एका घरामध्ये आरोपीने पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. महिला डॉक्टरने पोलिसांत तक्रार करू नये म्हणून पीडित महिला डॉक्टरला आरोपीने एका सदनिकेत कोंडून ठेवलं. या गंभीर प्रकरणाची तातडीनं दखल घेत पिंपरी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button