बीडमध्ये एका शेतकऱ्याने आपल्या बैलांना बैलपोळाला दारूचा नैवेद्य दाखवला

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


mediaराज्यभरात बैलपोळ्याच्या सण उत्साहात साजरा केला जात आहे. पोळा किंवा बैलपोळा हा सण सरत्या श्रावणाच्या पिठोरी अमावस्येच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी बैलांना विश्रांती दिली जाते. शेतकरी आणि बैल यांच्यासाठी हा दिवस खूप मोठा दिवस मानला जातो. बैल वर्षभर आपल्या मालकासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी कोणतीही तक्रार न करता राबराब राबतो. बैलपोळा हा दिवस आपल्या सर्जाराजाच्या प्रति कृतघ्नता व्यक्त करण्याचा दिवस आहे. बळीराजा आपल्या बैलांना या दिवशी बैलाचा साज, पायात घुगराचा चाळ, शिंगात, शेंब्या, गळ्यात घागरमाळ, पिताळाचा तोड्याचा जोड, फेटा, फुगे,लावून सजवतात. त्यांची पूजा करतात. बैल पोळ्याच्या निमित्त शेतकऱ्यासोबत शेतात राबणाऱ्या सर्जा राजाचे शेतकऱ्याकडून वाजत-गाजत मिरवणूक काढली जाते. त्यांना पुरणपोळीचा नेवेद्य देतात. मात्र बीडमध्ये एका शेतकऱ्याने आपल्या बैलांना बैलपोळाला दारूचा नैवेद्य दाखवला आहे.
बीडच्या आष्टी तालुक्यात देविनिमगाव येथे महादेव बाबुराव पोकळे नावाच्या शेतकऱ्याने आपल्या बैलांना बैलपोळ्या निमित्ये दारूचा नैवेद्य दाखवला एवढेच नाही तर त्यांनी आपल्या दोन्ही बैलांना चक्क दारू देखील पाजली. या घटनेमुळे परिसरात आणि पंचक्रोशीमध्ये चर्चा सुरू आहे.