वेशा व्यवसाय करण्यासाठी ऑनलाईन बुकिंग सेक्स रॅकेट पर्दाफाश

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

पिंपरी चिंचवड : वेशा व्यवसाय करण्यासाठी ऑनलाईन बुकिंग घेऊन सेक्स रॅकेट चालविणाऱ्या रॅकेटचा पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Police) पर्दाफाश केला. वाकडंच्या रांजना लॉजवर धाड टाकून सामाजिक सुरक्षा पथकाने ऑनलाइन सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला.
याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला असून यामधील दोन आरोपींना अटक केली आहे.
सामाजिक सुरक्षा पथकाने टाकलेल्या धाडीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या पश्चिम बंगालमधील तीन मुलींची सुटका केली आहे. वेश्याव्यवसाय करणाऱ्या तीनही मुली ह्या पश्चिम बंगालतील सिलीगुडी येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.

दरम्यान, ऑनलाईन सेक्स रॅकेट चालविणाऱ्या रॉनी बच्चालाल भारती, अमित उर्फ प्रवीण बळीराम आसटकर आणि वैष्णवी उर्फ रोहिणी भोसले या तीन आरोपीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल केल्या नंतर सामाजिक सुरक्षा पथकाने वैष्णवी उर्फ रोहिणी भोसले आणि राणी बच्चनलाल भारती या दोन आरोपीला अटक केली आहे. तर अमित उर्फ प्रवीण बळीराम आसटकर हा आरोपी अजूनही फरार आहे.