मृत्यूच्या 12 तासांनंतर एक चिमुकली अचानक जिवंत झाली आणि…

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला की सर्वांनाच ती व्यक्ती परत यावी असं वाटत असतं. काही तरी चमत्कार व्हावा अशी आशा असते. अशीच एक आश्चर्यकारक घटना आता समोर आली आहे. मृत्यूच्या 12 तासांनंतर एक चिमुकली अचानक जिवंत झाली आणि सर्वांनाच धक्का बसला आहे. सॅन लुइस पोटोसील राहणारी 3 वर्षांची कॅमिलिया रोक्साना, हिच्या पोटात इन्फेक्शन झालं होतं. तिच्यावर डॉक्टरांनी उपचार केले पण तिला वाचवता आलं नाही. उपचारावेळी तिचं हृदय बंद प़डलं आणि डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पण तब्बल 12 तासांनी चमत्कार झाला. आपल्या मुलीचा मृत्यू झाला, यावर तिच्या आईचा विश्वासच बसत नव्हता. माझी मुलगी जिवंत आहे, तिचा मृत्यू झाला नाही, असं ती सर्वांना ओरडून ओरडून सांगत होती.

मेक्सिको : मुलीवर अंत्यसंस्काराची वेळ आली. पण तरी आपली मुलगी जिवंत आहे, हा विश्वास तिच्या आईला होता. तिचं शवपेटीकडे लक्ष होतं. अचानक तिला शवपेटी हलताना दिली. तेव्हाही तिने सर्वांना याबाबत सांगितलं. पण तेव्हासुद्धा कुणीच तिच्यावर विश्वास ठेवला नाही. तिला भास झाला असावा असं सर्वांनी तिला सांगितलं. काही वेळाने शवपेटीतून आवाज येऊ लागला. मुलगी आतमध्ये रडत होती आणि आपल्या आईला आवाज देत होती. तेव्हा शवपेटी उघडली आणि पाहतो तर काय मुलगी चक्क जिवंत होती. मृत घोषित केल्यानंतर तब्बल 12 तासांनी मुलगी पुन्हा जिवंत झाली. लोक याला चमत्कार मानत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.