क्राईमताज्या बातम्याबीडमहत्वाचेमहाराष्ट्र

बीड पत्नीच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या


बीड : बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नीच्या जाचाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केली आहे. तरुणाने आत्महत्या करण्याआधी स्वत:च्या मोबाईलमध्ये व्हिडीओ काढला.
या व्हिडीओत त्याने आपण इतका टोकाचा निर्णय का घेत आहोत, याचं कारण सांगितलं आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. तरुणाकडे आयुष्यात अनेक पर्याय होते. पण त्या पर्यायांचा विचार न करता त्याने आत्महत्या सारखं टोकाचं पाऊल उचलल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.‘परमेश्वराकडे जाऊन मी त्याला मागणी मागेल की पुन्हा माणसाचा जन्म मला देऊ नको. घरातील सगळे चांगले आहेत. माझी पत्नी जिच्यावर मी खूप प्रेम केलं पण तिचं प्रेम दुसऱ्यावर आहे. म्हणून मी स्वतःला संपवत आहे’, असं तरुण आत्महत्या करण्यापूर्वी मोबाईलमध्ये काढलेल्या व्हिडीओत म्हणाला आहे.

संबंधित घटना ही बीडच्या माजलगाव शहरात उघडकीस आली आहे.
आकाश सुरेश मुळे (वय 25 वर्ष) आत्महत्या करणाऱ्या तरूणाचे नाव आहे. तरुणाने दोन दिवसांपूर्वी सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान जायकवाडीच्या उजव्या कालव्याच्या अँगलला गळफास घेऊन जीवन संपवले. पण त्याआधी त्याने स्वतःचा मोबाईलमध्ये व्हिडीओ काढला.

त्यानंतर त्याने गळफास घेतला. तरुण आपल्या पत्नीच्या जाचास कंटाळून जीवन संपवत आहे, असं व्हिडिओमध्ये सांगत आहे. या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पण पत्नीवर गुन्हा दाखल करण्यासाठी माजलगाव पोलीस टाळाटाळ करत असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे, अशी माहिती मृतक आकाशच्या नातेवाईकांनी दिली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button