मंदिरात चोरी,चोरट्यांनी दागिन्यांसोबतच मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणा पळवली

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


आजरा तालुक्यातील हालेवाडी गावात लक्ष्मी मंदिरात चोरी (gold was stolen from a temple) झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. कारण हे मंदिर भर वस्तीमध्ये असूनही चोरी झाल्याने सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चोरट्यांनी मूर्तीवरील 14 तोळे दागिने चोरले आहेत. विशेष म्हणजे ग्रामस्थांकडून या मंदिरात सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. मात्र, चोरट्यांनी दागिन्यांसोबतच मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणा देखील नेली आहे.

कोल्हापूर :  कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातील हालेवाडी गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये चोरटयांनी चक्क मंदिरातील 14 तोळे सोने लंपास
या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे हे मंदिर भर वस्तीमध्ये असूनसुद्धा चोरी (gold was stolen from a temple) झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आजरा तालुक्यातील हालेवाडी गावात चोरट्यांनी लक्ष्मी मंदिरातील मूर्तीवरचे दागिने चोरून नेले. चोरी करून चोरट्यांनी मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणा देखील पळवून नेली आहे.