शिंदे- फ़डणवीस सरकारच्या निर्णयावर तीव्र नाराजी,मुख्यमंत्री महोदय, हे वागणे बरे नव्हे

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


मुंबई: महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेल्या हजारो कोटी रुपयांच्या विकासकामांना स्थगिती देण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करतानाच, आपण एकत्र असताना मंजूर केलेल्या कामाला स्थगिती दिली आहेत.

मुख्यमंत्री महोदय, हे वागणे बरे नव्हे. कधी आपल्यालाही एकत्र यायला लागू शकते, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून लगावला.

विधानसभेत राज्यातील अतिवृष्टीवरील चर्चेदरम्यान अजित पवार यांनी आघाडी सरकाच्या काळातील मंजूर कामांना स्थगिती देण्याच्या शिंदे- फ़डणवीस सरकारच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. सरकारने आघाडी सरकारने मंजूर केलेली कामे थांबवत भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना प्रत्येकी ५० कोटींची कामे मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर आपण सत्तेत एकत्र असताना मंजूर केलेल्या कामांना काहीही कारण नसताना स्थगिती दिलीत, हे वागणे बरे नाही. सगळे दिवस सारखे नसतात. कधी आपल्यालाही एकत्र यायला लागू शकते हे लक्षात ठेवा अशा शब्दात पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले. एवढेच नव्हे तर अतिवृष्टी सगळीकडेच झाली आहे. सगळीकडेच सारखे नुकसान झाले आहे आहे. अशावेळी केवळ भाजप आणि शिंदे गटाच्याच मतदार संघांना मदत देण्याचे धोरम्ण घेता येणार नाही. तर रस्ते, जिल्हा मार्ग याबाबत लवचीक धोरम्ण स्वीकारून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांसाठी मदतीचे समान धोरम्ण राबविण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.