अंत्यविधीसाठी जाणाऱ्या वाहनाचे टायर फुटून जावई आणि सासूचा जागीच मृत्यू

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


नांदेड: नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी नांदेडला जाणाऱ्या वाहनाचे टायर फुटून झालेल्या अपघातात देगलूर तालुक्यातील जावई आणि सासूचा जागीच मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले आहेत.
हैदराबाद मार्गावरील कृष्णूरजवळ ही घटना घडली.

नांदेड येथील देगलूर नाका परिसरात एका नातेवाईकाचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यविधीसाठी देगलूर तालुक्यातील गोनेगाव व देगाव येथील नातेवाईक केए ३२/ एम ६४३२ या क्रमांकाच्या क्रुजर जीपने जात होते. सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान नांदेड- हैदराबाद महामार्गावर कुष्णूरजवळ जीपचे समोरील टायर फुटल्याने जीप पलटी खाल्ली. यात शेख महेबूब बाबू शेख (४०) व अहेमदबी शेख खुदबोद्दिन शेख (५५) या जावई व सासूचा जागीच मृत्यू झाला. पिरसाब नवाबसाब शेख (६५,गोनेगाव), खाजा मगदूम शेख (४५), फरजना खाजा शेख (४०, देगाव), खुदबोद्दीन नवाज साब (६० देगाव), घाशी साब बाबूसाब शेख (५५, चालक, गोनेगाव ), शादुल बाबूसाब शेख (४५, गोनेगाव) , आजमिर महेबूब शेख (४०, गोनेगाव), खाजा साब मौलासाब शेख (४५), हैदर इस्माईल साब शेख (४०, गोनेगाव) हे ८ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना नांदेड येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.