क्राईमताज्या बातम्याबीडमहत्वाचेमहाराष्ट्र

बीड मोबाईलवर फोन करून ओटीपी विचारत दिड लाख रुपयांचा गंडा


मोबाईलवर फोन करून ओटीपी विचारत दिड लाख रुपयांचा गंडा घातल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक महिती अशी, राहुल अच्यूतराव कदम (रा. शिवाजीनगर, बीड) हे पुणे येथे नोकरीला आहेत. 15 ऑगस्ट रोजी बीड येथे आले होते. त्यावेळी त्यांच्या मोबाईलवर एकाने फोन करून ‘तुम्हाला लिंक पाठवली आहे, त्या लिंकद्वारे केवायएसी अपडेट करून घ्या, त्यामध्ये आलेला ओटीपी मला सांगा’, असे सांगितले.

सुशिक्षित नोकरदाराने कशाचीही पडताळणी न करता आलेला ओटीपी त्या भामट्याला सांगितला. त्यांच्या बॅंक अकाऊंटवरून 1 लाख 39 हजार 900 रुपये कपात झाले. ही घटना 15 ऑगस्ट रोजी घडली. आपल्या फसवणूक झाल्याचे राहूल कदम यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Back to top button